इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी सुधा मूर्ती यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या आणि नारायण मूर्ती यांच्या पहिल्या भेटीसह विविध गोष्टींवरही मनमोकळेपणाने भाष्य केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा एका फ्लाईटमधील किस्सा समोर आला होता. यावेळी नारायण मूर्ती यांना करीना कपूरच्या वागण्यावर रागही व्यक्त केला होता. त्यावर आता त्याच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी भाष्य केले आहे.
आणखी वाचा : Video : “४५ हून अधिक वर्ष लोटली तरी…” नाना पाटेकरांनी केला मैत्रिणींचा खास पाहुणचार
इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरचा किस्सा सांगितला होता. मी लंडनहून भारतात येत असताना फ्लाईटमध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईटमधील काही लोक माझ्याजवळ येऊन मला अभिवादन करत होते, दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतात म्हणून मी उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होतो. काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिलादेखील हॅलो म्हणत होते. पण ती मात्र त्यांच्याकडे पाहतही नव्हती. मला ही गोष्ट खूप खटकली, असे त्यांनी सांगितले होते.
त्यावरुन सुधा मूर्ती यांनी करीनाला पाठिंबा देत नारायण मूर्ती यांना बोलताना थांबवले होते. त्यावेळी सुधा मूर्ती म्हणालेल्या की, “त्यांचे लाखो चाहते असतात. त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही. कदाचित ती थकली असावी. तुम्ही एक सॉफ्टवेअर उद्योजक आहात. तुमचे १० हजार चाहते असतील, पण सिनेसृष्टीतील कलाकारांचे चाहते लाखोंमध्ये असतात”, असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान सुधा मूर्ती या ‘द कपिल शर्मा शो’च्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये उपस्थित होत्या. या वेळी ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि अभिनेत्री रवीना टंडन यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. या वेळी सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याबरोबर त्यांना आलेले अनुभव सांगितले. तसेच काही गमतीशीर किस्सेही शेअर केले. त्यांच्या चित्रपट प्रेमाविषयी बोलताना त्यांनी दिलीप कुमार व शाहरुख खान यांचा उल्लेख केला.