प्रत्येक कलाकाराची अभिनयाची वेगवेगळी पद्धत असते. ‘मेथड अॅक्टिंग’बद्दल कलाकारांची विविध मतं असतात. काही कलाकारांनी ही पद्धत स्वीकारली, तर काहींनी ही पद्धत अव्यवहार्य असल्याचं म्हटलं. अभिनेत्री शीबा आकाशदीप साबीरने ‘ये आग कब बुझेगी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते सुनील दत्त यांनी तिला ‘मेथड अॅक्टिंग’ची ओळख करून दिली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील दत्त यांनी तिच्या पात्राची भावनिक अवस्था स्क्रीनवर दिसावी, यासाठी तिला कोणत्याही कलाकारांना भेटण्यास मनाई केली होती.
बॉलीवूड हंगामाशी बोलताना शीबा म्हणाली, “मी माझ्या पहिल्या चित्रपटात ‘मेथड अॅक्टिंग’ केली होती. क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू असताना हुंड्यासाठी मला जिवंत जाळण्यासाठी ते माझ्या अंगावर रॉकेल ओतत होते. हा सीन शूट करण्यापूर्वी दत्त साहेबांनी मला माझ्या सहकलाकारांशी आणि स्टाफशी बोलू दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, ‘दिवसभर एका कोपऱ्यात बसून रडत राहा कारण तू जळत आहेस आणि मला तू त्या मानसिक अवस्थेत हवी आहेस, म्हणून दत्तसाहेबांनी मला ‘मेथड अॅक्टिंग’ शिकवली. ‘मेथड अॅक्टिंग’ म्हणजे ते पात्र जगणं, त्याच मानसिक अवस्थेत राहणं होतंय. त्याकाळी आमचे लक्ष विचलित करण्यासाठी आमच्याकडे फोन नव्हते. त्या दिवसापासून, मी रडण्याचे सीन शूट करण्यासाठी ग्लिसरीनचा वापर केला नाही,” असं शीबाने नमूद केलं.
हेही वाचा – २५ दिवसांत १६ किलो वजन घटवलं अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी अत्यंत मूर्खासारखा…”
‘ये आग कब बुझेगी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील दत्त यांनी केले होते, तसेच ते रेखा यांच्याबरोबर मुख्य भूमिकाही केली होती.
शीबाने यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सुनील दत्त यांचा आणखी एक प्रसंग सांगितला होता. ‘ये आग कब बुझेगी’मध्ये काम करत असताना शीबाने रजनीकांत यांचा अथिसया पिरावीला सिनेमा साइन केला होता. त्यामुळे संजय दत्त नाराज झाले होते. हा सिनेमा करताना शीबाने दुसरा चित्रपट करावा, अशी त्यांची इच्छा नव्हती; खासकरून रजनीकांत यांच्यासारख्या सुपरस्टारबरोबर. कारण ‘ये आग कब बुझेगी’ आधी रिलीज व्हावा आणि रजनीकांत यांच्या चित्रपटाचा फटका याला बसू नये, असं त्यांना वाटत होतं.
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
शीबाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची करण जोहर दिग्दर्शित रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकली होती.