बरीच सेलिब्रिटी मंडळी सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे जोडीदारावर असणारं आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. या मंडळींचे व्हिडीओ व फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. कलाक्षेत्रामधील अशाच एका जोडप्याच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. शेफाली जरीवाला आणि तिचा पती पराग यांचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेफाली जरीवाला मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. तिचा नवरा पराग त्यागी तिला सोडण्यासाठी आला होता. पापाराझींसमोर दोघांनी एकमेकांना लिप किस केलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर, जेव्हा पापाराझींनी त्यांना पुन्हा असे करण्यास सांगितले तेव्हा दोघांनीही हसत-हसत पुन्हा एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेतले.

आणखी वाचा : थलपती विजयची ‘CAA’वर टीका; तामिळनाडूमध्ये कायदा लागू न करण्याची केली विनंती

काही लोकांना शेफाली आणि परागचे हे वर्तन आवडलेले नाही. काहींनी हा सगळा दिखावा असल्याचे सांगितले तर काहींनी ही नाटकं घरी दाखवायची असं कॉमेंट करत टोमणा मारला आहे. एका युझरने “त्यांना आता इथे गादी आणि अंथरूणदेखील आणून द्या.” असं कॉमेंटमध्ये लिहिलं आहे. तर एका युझरने लिहिलं, “अभिनेते आणि अभिनेत्रींपेक्षा आणखी चीप कुणीच नाहीये या जगात.” एकूणच शेफाली आणि पराग यांच्या या कृतीवर सगळेच टीका करताना दिसत आहेत.

शेफालीला ९० च्या दशकात आणि नंतरही ‘कांटा लगा’ या गाण्याने खूप प्रसिद्धी मिळाली, पण त्यानंतर ती लाईमलाइटपासून दूर गेली. ‘बिग बॉस १३’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली. शेफालीने २००४ मध्ये संगीतकार हरमीत सिंगशी लग्न केले, पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने २०१५ मध्ये पराग त्यागीशी लग्नगाठ बांधली. दोघांनाही अद्याप मूलबाळ नाही. मीडिया रीपोर्टनुसार दोघेही लवकरच मूल दत्तक घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.