अभिनेत्री शेफाली शाह ही सध्याच्या घडीची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही वर्षात ती अनेक चित्रपटांमध्ये आणि वेब सिरिजमध्ये झळकली. ‘दिल्ली क्राईम’ या वेब सिरिजमुळे तीची लोकप्रियता आणखीनच वाढली. या सिरिजचा पहिला सिझन सुपरहिट झाल्यानंतर ‘दिल्ली क्राईम्स’च्या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आता शेफाली ‘डॉक्टर जी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

आणखी वाचा : हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त मिलाप, ‘भेडिया’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणार ट्रेलर प्रदर्शित

नुकतीच तिने ‘नवभारत टाईम्स’ला एक मुलाखत दिली, ज्यात तिने पैसा महत्वाचा की कौटुंबिक मूल्य महत्वाची याबद्दल एक महत्वाचे विधान केले आहे. ती म्हणाली, “मी आज जी काही आहे ती माझ्या आई-वडिलांनी केलेल्या संघर्षामुळे, त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे, त्यांनी मला दिलेल्या शिकवणीमुळे आहे. आज मी मातीशी जोडली गेले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या आई- वडिलांचे आहे.”

पुढे तिने सांगितलं. “जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर तुम्हाला त्यावर काम करावे लागेल, त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. परंतु ते करत असताना तुम्ही समाधानी आणि आनंदी असणे सर्वात महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा हा नक्कीच गरजेचा आहे, पण त्यापलीकडे जाऊन तुमची मूल्ये ही पैशापेक्षा जास्त महत्वाची आहेत. आजही मला रिक्षातून प्रवास करायला अजिबात संकोच वाटत नाही. कारण मी आजही माझी कौटुंबिक पार्श्वभूमी, मला मिळालेली शिकवण विसरलेले नाही. मला नेहमी असे वाटते की आपला आनंद कधीही पैशाशी संबंधित नसावा.”

हेही वाचा : ऐतिहासिक… दिल्ली क्राईमची जागतिक स्तरावर दखल; पटकावला एमी पुरस्कार

यावर्षी शेफाली शाह ‘जलसा’, ‘डार्लिंग्स’ आणि आता ‘डॉक्टर जी’ अशा तीन चित्रपटांमध्ये झळकली. तशीच तिची ‘दिल्ली काईम २’ ही सिरिजही याच वर्षी प्रदर्शित झाली. या चारही कलाकृती या एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या. त्यामुळे २०२२ हे वर्ष तिच्यासाठी खूप खास ठरलं.

Story img Loader