अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही बॉलीवूडमधील पदार्पणाच्या आधीपासूनच खूप चर्चेत असते. लवकरच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या टीमबरोबर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. प्रमोशनदरम्यान तिने सलमान खानच्या चित्रपटांबद्दल एक वक्तव्य खूप चर्चेत आलं होतं. तर त्यावर आता अभिनेत्री शहनाज गिलने प्रतिक्रिया देत पलकचं म्हणणं खोडून काढलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पलकने सलमान खानच्या चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचं शरीर नीट झाकलं जाईल, असे कपडे घालायचे असा नियम असल्याचं म्हटलं होतं. तिचं हे विधान खूप चर्चेत आलं. त्यानंतर “माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला,” असं म्हणत तिने तिच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. तिच्या या विधानावर आता अभिनेत्री शहनाज गिल हिने प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “प्रत्येक पार्टीत आर्यन…” पलक तिवारीचा शाहरुख खानच्या लेकाबद्दल मोठा खुलासा

शहनाज नुकतीच एक मुलाखत दिली. त्यावेळी पलकने केलेल्या या विधानावर शहनाजला प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी तिने “असं काही नाही. प्रमोशनदरम्यान मीही शॉर्ट ड्रेसेस घातले होते,” असं म्हणत सलमानने त्याच्या सेटवर काम करणाऱ्या मुलींसाठी कोणताही नियम बनवला नव्हता असा खुलासा केला आहे. शहनाजने दिलेली ही प्रतिक्रिया आता खूप चर्चेत आली आहे.

हेही वाचा : Video: रूममध्ये सिंहाला बघताच जोरात ओरडू लागली शहनाज गिल, पुढे असं काही घडलं की…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान त्यांचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसह व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत आहेत. 

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shehnaaz gill gave reaction about palak tiwari dress code statement rnv