शेखर सुमन पाटणा सोडून मुंबईत आल्यावर अवघ्या दोन आठवड्यांनी त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाचं नाव ‘उत्सव’ होतं आणि यात रेखा यांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता. आता ४० वर्षांनी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर काम करण्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटात रेखा व शेखर यांचे इंटिमेट सीन्स होते, पण अभिनेत्रीने कोणतीही तक्रार न करता हे सर्व सीन शूट केले होते, असं शेखर सुमन म्हणाले.

शेखर सुमन यांनी रेखा यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करण्याचं कौतुक केलं. आयकर विभागाकडून रेखा यांच्या घरावर छापेमारी केली जात होती, पण तरीही त्यांनी सेटवर चित्रपटाचं शूटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, अशी आठवण शेखर यांनी सांगितली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ‘उत्सव’विषयी शेखर म्हणाले, “भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील कोणत्याही नवोदित कलाकारासाठी पदार्पणाची ही कदाचित सर्वात अप्रतिम संधी असेल. मी माझी सुटकेसही उघडली नव्हती आणि १५ दिवसांत मला चित्रपटासाठी साइन केलं गेलं. त्यानंतर दोन महिन्यांत मी रेखासोबत शूटिंग करत सेटवर होतो. शशी कपूर, गिरीश कर्नाड, रेखा या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन.”

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
nana patekar
‘एखादा सिनेमा गेला त्याची खंत नाही का?’ नाना पाटेकर म्हणाले, “खूप रोल गेले त्यात माझा…”

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

शेखर पुढे म्हणाले, “मी रेखापेक्षा जास्त प्रोफेशनल कलाकाराला आजवर भेटलो नाही. मला आठवतं की शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी झाली होती. इतर कोणीही कलाकार असता तर आपली बॅग भरून सेटवरून निघून गेला असता. पण त्या म्हणाल्या, ‘त्यांना त्यांचं काम करू द्या, मी इथं राहून माझं काम करेन’. त्यावेळी मला भीती वाटत होती की त्या निघून जातील, चित्रपट बंद होईल आणि माझी स्वप्नं अपूर्ण राहतील, पण त्या गेल्या नाहीत.”

ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”

रेखा सेटवर कधीच नखरे दाखवायच्या नाही, अगदी इंटिमेट सीनच्या बाबतीतही नाही, असं शेखर यांनी सांगितलं. “त्यांनी मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना कधीच कुठेही स्पर्श करण्यास मनाई केली नाही, त्या इतर अभिनेत्रींप्रमाणे नाहीत. त्या व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करणाऱ्या आहेत. मी त्यांचा कायम ऋणी राहीन,” असं शेअर म्हणाले.

चाहती अचानक स्टेजवर आली, मिठी मारली, हाताचं चुंबन घेतलं अन्…; प्रसिद्ध गायकाने केलं असं काही की… पाहा VIDEO

पुढे शेअर म्हणाले, “उत्सवनंतर मी बरेच चित्रपट केले, मी मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केलं, परंतु काही वेळानंतर चांगल्या भूमिका कमी मिळू लागल्या, त्यामुळे मी एक पाऊल मागे घ्यायचं ठरवलं. पण नियती प्रत्येकाच्या आयुष्यात मोठी भूमिका बजावते. मी काय मिळालं नाही, याऐवजी काय मिळवलं याकडे लक्ष देतो. मी पाटण्यातील एक साधासा मुलगा होतो, ज्याने इतक्या मोठ्या दिग्गजांबरोबर काम करता येईल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.”

दरम्यान, ४० वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या शेखर सुमन यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी टीव्ही शोचे परीक्षक म्हणून काम पाहिलं, शो होस्ट देखील केले. लवकरच ते संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये दिसणार आहेत.

Story img Loader