सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची चलती आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान सारख्या स्टारकिड्सने चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या स्टारकिड्सच्या यादीमध्ये अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनचाही समावेश आहे. अध्ययनने ‘हाल ए दिल’ चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. ‘राज द मिस्ट्री’ हा त्याचा दुसरा चित्रपट होता. या दोन्ही चित्रपटानंतर अध्ययन फारसा कुठेच दिसला नाही. आता त्याने काम न करण्यामागे धक्कादायक खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अध्ययनने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तो म्हणाला, “माझ्या वडिलांचा ‘मुवर्स अँक शेकर्स’ शोमुळे मला अधिक चित्रपट मिळाले नाहीत. प्रत्येक भागासाठी त्यांना एक स्क्रिप्ट देण्यात येत होती. पण शेखर सुमन यांनी आमच्याबाबत असं भाष्य का केलं? याबाबत काही लोकांची मनं दुखावली गेली”.

आणखी वाचा – अमेरिकेत स्वत:ची कामं स्वत:च करताहेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार, विशाखा सुभेदार म्हणाली, “परदेशात आपल्या माणसांची…”

शेखर सुमनच्या मुलाने सांगितला ‘तो’ प्रसंग

“त्यांनी या शोमध्ये कोणतेच अपशब्द वापरले नाहीत. तसेच कोणावरही व्यक्तीगत टीका केली नाही. तो फक्त एक शो होता. पण लोकांनी हे सगळं चुकीच्या पद्धतीने घेतलं. शेखर सुमनच्या मुलाचा याबाबत बदला घ्यायचा असं लोकांनी ठरवलं”. अध्ययनने या मुलाखतीमध्ये एक धक्कादायक किस्साही सांगितला. त्याला काम मिळणं बंद झालं होतं.

आणखी वाचा – अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ करतो ‘हे’ काम, भावावर आहे जीवापाड प्रेम, निवेदिता फोटो शेअर करत म्हणाल्या…

तो म्हणाला, “एक निर्माता होता. ज्याने माझ्यासमोरच दुसऱ्या एका निर्मात्याला फोन केला. “आम्ही अध्ययनला एका चित्रपटासाठी साईन करण्याचा विचार करत आहोत” असं त्या निर्मात्याने समोरच्या निर्मात्याला फोनवर सांगितलं. पण त्या समोरच्या निर्मात्याने सांगितलं की, “तो वक्तशीर नाही. शिवाय तो ड्रग्जही घेतो. त्याला चित्रपटामध्ये घेऊ नको”. अध्ययनने इंडस्ट्रीमधील कटू सत्याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shekhar suman son adhyayan talk about his work says removed from movie because of father popular movers and shakers show see details kmd
Show comments