‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व चांगलंच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानला पाहून प्रेक्षक नाखूश आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून संताप व्यक्त केला आहे. दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला बिग बॉसमधून काढून टाकण्याची मागणी केली होती.
मीटू प्रकरणात अडकल्यामुळे चर्चेत आलेल्या साजिद खानवर अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही गंभीर आरोप केले होते. शर्लिनने ट्वीट करत साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. “साजिद खानने मला त्याचे गुप्तांग दाखवून शून्य ते १० दरम्यान रेटिंग दे असं म्हटलं होतं. आता मला ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन त्याला रेटिंग द्यायचं आहे. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते, हेदेखील देशाला बघू दे. सलमान खान कृपया तुम्ही याबद्दल काहीतरी भूमिका घ्या”, असं म्हणत तिने सलमान खानलाही या ट्वीटमध्ये टॅग केलं होतं. त्यानंतर बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी शर्लिनची बाजू घेतली तर काही कलाकारांनी साजिद खानची बाजू घेतली. एकूणच हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच चिघळताना दिसत आहे.
आणखी वाचा : “छठपूजा ही निसर्गाचा आदर…” बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं त्यांच्या पवित्र सणाचं महत्त्व
ज्या सलमान खानला टॅग करून शर्लिनने ट्वीट केलं होतं त्याच सुपरस्टारवर आता शर्लिनने आरोप केले आहेत. शर्लिनने नुकतंच जुहू पोलिस स्टेशनमध्ये येऊन आपल्या तक्रारीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण जुहू पोलिसांकडून तिला कसलीही मदत मिळत नसल्याचं तिने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बरेच दिवस शर्लिन या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे पण तिला याबाबतीत न्याय मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त करून दाखवली आहे. शिवाय जुहू पोलिस आपल्याला गांभीर्याने घेत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
आपल्या केससाठी एखादी महिला ऑफिसर नेमण्यास शर्लिनने विनंती केली आहे जेणेकरून ती तीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करू शकेल, पण पोलिसांवरही वेगळं प्रेशर असल्याचंही शर्लिनने सांगितलं. एवढं बोलून शर्लिन थांबली नाही तर उद्विग्न होऊन ती म्हणाली की, “साजिद खानच्या डोक्यावर सलमान खानचा यांचा हात आहे, आणि जोवर ते आहेत साजिदच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही.” शर्लिनच्या या आरोपामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. याआधीसुद्धा सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात सलमान खानचं नाव समोर आलं होतं. आता पुन्हा साजिद खान प्रकरणी शर्लिन चोप्राने एवढे गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे.