बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ५७ वा वाढदिवस आहे. काल रात्री त्याने त्याचे नातेवाईक आणि जवळची मित्र मंडळी यांच्याबरोबर मिळून त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. त्याचे चाहतेही त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. पण अशा शर्लिन चोप्रा हिने सलमान खान वर निशाणा साधत त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार नाही असं स्पष्ट सांगितलं.
शर्लिन चोप्राने साजिद खानवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप लावले होते. साजिद खान ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यावर शर्लिनने त्याला बिग बॉस बाहेर काढण्यासाठी आवाज उठवला. सलमान खान यालाही तिने साजिद खानला घराबाहेर काढावे अशी विनंती केली होती. मात्र सलमानने शर्लिनची बाजू न घेता साजिद खानच्या बाजूने तो उभा राहिला. त्यामुळे आता शर्लिन सलमान खानवर चांगलीच नाराज झालेली आहे.
शर्लिन चोप्राचा काल शूट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओत रिपोर्टर्सशी संवाद साधताना दिसत आहे. त्यावेळी एका रिपोर्टरने तिला म्हटलं, “आता नवीन वर्ष येताय तर पुढील वर्षी तुझं टार्गेट कोण असणार?” त्यावर क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, “सलमान खान.”
हेही वाचा : “सलमान आणि शाहरुख दोघेही…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव
नंतर रिपोर्टर म्हणाला, “उद्या (आज) त्याचा वाढदिवस आहे.” त्यावर शर्लिन म्हणाली, “मग मी काय त्याला शुभेच्छा देऊ? का देऊ? आपल्या पीडित बहिणींसाठी त्याने काय केलं?” आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.