मागच्या काही दिवसांपासून शर्लिन चोप्रा आणि सादिज खान हा वाद चर्चेत आहे. शर्लिन चोप्राने काही दिवसांपूर्वीच साजिदवर लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता तिने साजिदने लैंगिक शोषण करून धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. साजिद खानविरोधात शर्लिनने मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. एवढेच नाही तर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शर्लिन चोप्राने साजिद खानला तुरुंगात टाकण्याची इच्छाही व्यक्त केली.

एएनआयशी बोलताना शर्लिन म्हणाली, “मी नुकतीच #MeToo आरोपी साजिद खानच्या विरुद्ध लैंगिक छळ आणि धमकीची तक्रार दाखल केली आहे. जेव्हा मी तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले तेव्हा पोलिसांनी मला सर्वप्रथम ही घटना कधी घडली असं विचारलं. मी त्यांना, हे सर्व २००५मध्ये घडल्याचं सांगितलं. त्यावर त्यांनी मला, त्याच्यापर्यंत पोहोचायला इतका वेळ का लागला? असा प्रश्न केला. त्यावेळी मी, साजिद खानसारख्या नाव मोठं असलेल्या व्यक्तीविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्याचं धाडस माझ्यात नव्हतं, असं उत्तर दिलं.

Saif Ali Khan Attack Updates kareena kapoor first reaction
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट! म्हणाली, “प्रचंड आव्हानात्मक दिवस…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Saif Ali Khan Attacked With Knife At Home
Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खानच्या घरात घुसलेला आरोपी हा…”, डीसीपी गेडाम यांनी दिली महत्त्वाची माहिती
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा- लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या साजिद खानला बहीण फराह खानचा पाठिंबा? सलमान खानला म्हणते…

शर्लिन पुढे म्हणाली, “२०१८ मध्ये सुरू झालेल्या ‘मीटू’ चळवळीदरम्यान, जेव्हा मी महिलांना पुढे येताना आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बोलताना ऐकलं तेव्हा मला धीर आला. साजिद खान केवळ माझ्याबरोबरच नाही तर अनेक महिलांबरोबर असा वागला आहे. साजिद खानने त्या महिलांशी कसे गैरवर्तन केले हे तुम्ही सोशल मीडियावरून जाणून घेऊ शकता.”

याबद्दल बोलताना शर्लिन म्हणाली, “साजिदने काही महिलांना थेट सेक्सबद्दल विचारलं, जसं की त्या एका दिवसात किती वेळा सेक्स करतात? त्यांचे किती बॉयफ्रेंड आहेत? एवढंच नाही तर साजिदने मला त्याचे गुप्तांग दाखवून त्याला स्पर्श करण्यास सांगितलं होतं. मग या घटनेला एवढी वर्षे झाल्यानंतर एखादी स्त्री आपल्या वेदना सांगू शकत नाही का? अर्थातच ती करू शकते. त्यावेळी माझ्याकडे तेवढी हिंमत नव्हती पण आज मी हे करू शकते. आज मला वाटतं की साजिद खान असो किंवा राज कुंद्रा, जर त्याने चूक केली असेल तर मी त्याच्या विरोधात आवाज उठवू शकते.”

आणखी वाचा-काम देतो म्हणून आधी घरी बोलावलं अन् नंतर…; प्रसिद्ध अभिनेत्रीचे दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप

साजिद खानविरुद्धच्या पुराव्यांबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मग माझ्याकडे त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता कारण दिग्दर्शक किंवा निर्मात्याबरोबरच्या व्यावसायिक भेटीदरम्यान मी कोणताही स्पाय कॅमेरा सोबत ठेवला नव्हता. त्यामुळे जर पोलिसांनी जर मला पुराव्याबद्दल विचारलं असतं तर मी काय सांगणार होते? साजिद खान हा फराह खानचा भाऊ आहे, तो शाहरुख खान आणि सलमान खानचा चांगला मित्र आहे. त्याच्यासमोर मी काहीच नाहीये. मी फक्त बाहेरची व्यक्ती आहे, बाकी काही नाही. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझं सत्य सिद्ध करणं कठीण होतं.”

या मुलखतीत शेवटी शर्लिन चोप्रा म्हणाली, “मी माझ्या मित्रांना आणि जवळच्या लोकांना याबद्दल सांगितलं होतं, पण माझ्या कुटुंबाला नाही, कारण ते माझ्याबद्दल काय विचार करतील असा विचार कायम माझ्या मनात यायचा. त्यावेळी मी माझ्या वडिलांना गमावलं होतं आणि त्यामुळे माझं कुटुंब खूप अस्वस्थ होतं.

Story img Loader