संपूर्ण देशभरात करवाचौथ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूडमधील कलाकारांनीही करवाचौथ साजरा केला. अगदी कतरिना कैफपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत सर्वच अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यावेळी बॉलिवूड वाइव्सनी अनिल कपूर यांच्या घरी करवा साजरा केला. मात्र अभिनेत्री शिबानी दांडेकरने पहिला करवाचौथ असूनही कोणतही व्रत केलं नाही किंवा उपवासही ठेवला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरचा लग्नानंतर पहिला करवाचौथ होता. पण शिबानीने यावेळी व्रत केलं नाही. याची माहिती शिबानीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आणि त्याचबरोबर तिने असं करण्यामागचं कारणही सांगितलं. शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने सुंदर मंगळसूत्र घातलेलं दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने सर्वांना करवाचौथच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा- मंगळसूत्र, सिंदूर, हातात चुडा अन्…, विकी- कतरिनाचा पहिला करवाचौथ थाटामाटात साजरा

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना शिबानीने लिहिलं, “मी माझ्या पहिल्या करावाचौथच्या निमित्ताने सुंदर मंगळसूत्र घातलं आहे. मी व्रत केलेलं नाही किंवा उपवासही ठेवलेला नाही. माझं प्रेमच फरहानसाठी खूप आहे. फरहानचंही म्हणणं आहे की आपण प्रेम साजरं करूयात.” फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केलं होतं. त्याआधी बरीच वर्षं दोघंही एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी त्यांनी हे नातं कोणापासूनच लपवलं नव्हतं.

आणखी वाचा- “माझं तुझ्यावर प्रेम आहे…” प्राजक्ता माळीला थेट सोशल मीडियावरून चाहत्याने केलं प्रपोज

दरम्यान फरहान अख्तरने शिबानी दांडेकरशी दुसरं लग्न केलं आहे. त्याआधी त्याचं लग्न अधुना भबानीशी झालं होतं. फरहान आणि अधुना यांना दोन मुली आहेत. अधुना ही व्यवसायाने हेअरस्टायलिस्ट आहे. अधुना आणि फरहानची ओळख ‘दिल चाहता है’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर फरहानने यावर्षी फेब्रुवारीमध्ये शिबानीशी लग्न केलं.