सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीचा रिसेप्शन सोहळा काळ रविवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. बॉलिवूडचे कलाकार एखाद्या कार्यक्रमाला येणार म्हणजे त्यांच्या हटके फॅशनची चर्चा होणारच, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या रिसेप्शनला हजेरी लावली खरी मात्र तिला ट्रोलदेखील करण्यात आले.

शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये फिटनेससाठी ओळखली जाते. व्हिडीओ व्हायरल होत असतात. तिच्या फिगरचेदेखील कौतुक होत असते. सिद्धार्थ सिद्धार्थच्या रिसेप्शनला तिने सिल्कची चंदेरी रंगाची साडी साडी परिधान केली होती. यात ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने फोटोग्राफरना वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढून दिले. याचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी स्तुती केलीच आहे मात्र तिच्या नवऱ्यावरून तिला ट्रोल केलं आहे.

“मी हरत नसतो तर समोरच्याला…” मराठी ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकराचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

शिल्पाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी कमेंट करू लागलेत. एकाने लिहले आहे, “नवी नवरीदेखील हिच्या पुढे फिकी,” तर दुसऱ्याने लिहले आहे, “तिच्या वयाच्या मानाने खूपच सुंदर दिसत आहे.” आणखीन एकाने लिहले आहे, खूपच हॉट दिसत आहे,” अनेकांनी तिच्या साडीच कौतुक केलं आहे. साडीत खूप छान दिसते असे एकाने लिहले आहे. मात्र अनेकांना हा प्रश्न पडला आहे की तिचा पती राज कुंद्रा कुठे आहे? अनेकांनी कमेंटमध्ये लिहले आहे” मास्क मॅन कुठे आहे?”

दरम्यान राज कुंद्रा मागच्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला होता. त्यानंतर त्याने बराच काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. तसेच तो मीडियापासून अद्याप दूर आहे. या दोघांनी २००९ मध्ये लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.

Story img Loader