शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी आणि तिच्या जीम लूकसाठी बरीच चर्चेत असते. शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे बॉलिवूडवर आणि रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केले आहे. शिल्पा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी एकेकाळी ती चित्रपटसृष्टीत सर्वात बिझी अभिनेत्री होती. शिल्पाचं नाव त्यावेळी बऱ्याच अभिनेत्यांशी जोडलं गेलं. खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारबरोबर त्याकाळी शिल्पाचे अफेअर होते. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
शिल्पाचे अक्षय कुमारवर खूप प्रेम होते, पण जेव्हा तिला कळले की अक्षय तिची फसवणूक करत आहे तेव्हा ती कोलमडली. २००० मध्ये शिल्पा शेट्टीने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी शिल्पाने सांगितले की, अक्षय जेव्हा तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता. जेव्हा तिला या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला.
आणखी वाचा : २८५० कोटींच्या संपत्तीचा मालक सलमान खान 1BHK फ्लॅटमध्ये का राहतो? ‘या’ खास व्यक्तीने सांगितलं कारण
या मुलाखतीमध्ये शिल्पा म्हणाली “माझ्यासाठी जीवनातील हा खूप वाईट काळ होता, मी त्यावर मात केली याचा मला आनंद आहे. काळोख्या रात्रीनंतर सकाळ होतेच. माझ्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सर्व काही ठीक चालले होते, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले.” इतकंच नाही तर अक्षय कुमारबद्दल आणखी एका गोष्टीचा तिने खुलासा केला.
अक्षय त्यांच्या गर्लफ्रेंड्सची समजूत काढण्यासाठी, किंवा त्यांचा राग घालवण्यासाठी एक शक्कल लढवायचा. त्याविषयी शिल्पाने सांगितलं. “अक्षय त्याच्या प्रेयसीचे मन वळवण्यासाठी एक युक्ति लढवायचा. अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री उशिरा मुंबईतील सिद्धी विनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन देत असे. पण त्याच्या आयुष्यात नवीन मुलगी येताच त्याला या वचनाचा विसर पडायचा.” अक्षय कुमारचं नाव याआधीही बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. शिल्पाआधी अक्षय कुमार आणि रविना टंडनबरोबरही त्याचं अफेअर होतं.