बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी खरं तर पॅपराजींमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेकदा ती त्यांच्याशी संवाद साधताना आणि थांबून फोटोंसाठी पोज देताना दिसते. शिल्पा शेट्टीचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात ती फोटोग्राफर्सशी खूप प्रेमाने वागताना दिसली आहे. पण सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती फोटोग्राफर्सवर भडकलेली दिसत आहे. एवढंच नाही तर तिने या फोटोग्राफर्सना सुनावलं.
शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल सेलिब्रेटींपैकी एक आहे. तिचा फॅशन सेन्स आणि स्टाइल नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे तिची झलक कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीच तत्पर असतात. पण आता शिल्पाचे फोटो क्लिक करणाऱ्या एका फोटोग्राफरकडून चूक झाली आणि शिल्पाने त्यावर नाराजी व्यक्त करत त्याला चांगलंच सुनावलंही.
आणखी वाचा-शिल्पा शेट्टीने शेअर केला लेक समीशाचा क्यूट व्हिडीओ; नेटकरी म्हणाले “मुलांना संस्कार…”
शिल्पा एका बिल्डिंगमधून बाहेर निघत असतानाच काही फोटोग्राफर्सनी तिला घेरलं. ते तिचे फोटो काढण्यासाठी पुढे आले. सुरुवातीला शिल्पानेही त्यांना फोटोंसाठी पोज दिली. तिने कधी धावताना, थांबताना अशा वेगवेगळ्या पोज दिल्या. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसण्यासाठी जाऊ लागली. पण तेव्हाच एका फोटोग्राफरने तिला पुन्हा थांबून पोज देण्याची विनंती केली आणि याच प्रयत्नात तो शिल्पाच्या खूपच जवळ गेला. ज्यामुळे शिल्पा वैतागली.
फोटोग्राफरच्या या वागण्यावर शिल्पा शेट्टी नाराज झाली. त्या फोटोग्राफरवर रागावत ती म्हणाली, “आता काय माझ्या तोंडात घुसून फोटो घेणार आहेस का?” एवढं बोलून शिल्पा तिच्या कारमध्ये बसण्यासाठी गेली. पण या गडबडीत कारमध्ये बसताना तिचं डोकं मागच्या बाजूने आपटलं. पण तरीही ती हसत हसत सर्वांना बाय म्हणून निघून गेली. हा पूर्ण व्हिडीओ विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यावर युजर्स आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.