गेल्या काही महिन्यात राज कुंद्रा हे नाव चांगलंच चर्चेत आलं होतं. सेमी पॉर्न चित्रपटाच्या निर्मितीचे आरोप झाल्याने मध्यंतरी राज कुंद्राला अटक झाली. शिल्पा शेट्टीचा नवरा म्हणून यानंतर शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांबद्दलही बऱ्याच उलट सुलट गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या गेल्या. उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली होती. आता राजची जामिनावर सुटका झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जामिनावर बाहेर आल्यानंतर राज बऱ्याच ठिकाणी मीडियासमोर आला तेव्हा त्याने घातलेल्या मास्कवरून त्याला बऱ्याच लोकांनी डिवचलं. कित्येकांनी राजची खिल्लीदेखील उडवली. नुकतंच राजने ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. #AskRaj च्या माध्यमातून त्याने लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच तर उडवली आहे.

आणखी वाचा : तब्बल ३ दशकं शाहरुख गाजवतोय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य; सुपरस्टारचा प्रवास उलगाडणारे दुर्मिळ फोटो पहा

बऱ्याच नेटकऱ्यांनी त्याला ‘तू मास्क कधी काढणार?’ असा प्रश्न विचारला तर त्यावर स्पष्टीकरण देत राजने उत्तर दिलं आहे. तो हे मीडियापासून दूर राहण्यासाठी करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय एकूणच मीडियाच्या माध्यमातून त्याची प्रतिमा ज्या पद्धतीने मलिन करण्यात आली आहे त्यामुळे राज चांगलाच दुखवला गेला असल्याचंही सांगितलं आहे. मीडिया ही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही असंही राज म्हणाला.

एवढंच नाही तर लोकांनी त्याला ‘पॉर्न चित्रपट खरंच बनवता का?’ असा सवालही केला तेव्हा त्यावर राजने स्पष्टपणे नकार दिला. इतकंच नाही तर “माझ्या विरोधकांनी हे एक प्रकारचं षडयंत्र रचलं आहे. लवकरच यामागील सत्य समोर येईल” असं म्हणत राजने लोकांना उत्तर दिलं आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रपटांच्या निर्मितीचे आरोप लागले होते. त्याच्या अटकेमुळे मनोरंजनसृष्टीत चांगलीच खळबळ माजली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty husban raj kundra clarigies about his media trial because of pornogaphy case avn
Show comments