अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तीन दशकांहून अधिक काळापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी शिल्पा उत्तम डान्सरही आहे. छोट्या पडद्यावरील अनेक रिअ‍ॅलिटी शोची परीक्षक म्हणून ती काम करते. अभिनयाबरोबरच ती तिच्या फिटनेससाठी खूप लोकप्रिय आहे. नुकतीच ती रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सिरीजमध्ये झळकली. आता शिल्पाला एक पुरस्कार मिळाला आहे, तिनेच पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ हा पुरस्कार समाज सेवा, सामाजिक विकास, शिक्षण, नवनवीन उपक्रम, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो. कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज २०२३’ हा पुरस्कार शिल्पा शेट्टी कुंद्राला देण्यात आला आहे.

हेही वाचा… “विनोद आणि त्यांचं टायमिंग खऱ्या अर्थाने…”, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर केदार शिंदेंची पोस्ट

शिल्पा शेट्टीला गौरविण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा सूत्रसंचालकाने तिच्या कला क्षेत्रातील कामगिरी सांगितली. “शिल्पा शेट्टी कुंद्रा तुम्ही एक प्रतिष्ठीत भारतीय अभिनेत्री आणि योग विद्येत पारंगत आहात. कला आणि कलाकाराला कोणतेही वय आणि सीमा नसते. याचं आदर्श उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही १९९३ साली आलेल्या ‘बाजीगर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात केली आणि आज २०२४ मध्येही तुम्ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ मधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रधानमंत्री मोदी आणि भारत सरकारने सुरू केलेल्या एफ आय आर इंडिया मोमेंट मोहिमेत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आपला समावेश करण्यात आला आहे. कलेच्या क्षेत्रातील तुमच्या कौतुकास्पद योगदानामुळे तुम्हाला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र २०२३’ ने सन्मानित करण्यात येत आहे,” असं सूत्रसंचालकाने म्हटलं.

या पुरस्कार सोहळ्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “माननीय न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि माननीय न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा यांच्या हस्ते ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज २०२३’ पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आणि सन्मानित आहे. अभिमानी भारतीय म्हणून मला माझ्या कामाचा प्रचंड अभिमान वाटतो. मनोरंजन व फिटनेसद्वारे मी लोकांच्या आरोग्यासाठी आणि निरोगीपणासाठी जागरूकता व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करतेय. या प्रेमामुळे आणि कौतुकामुळे मला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. हा पुरस्कार माझ्या प्रेक्षकांसाठी आहे. धन्यवाद,” असं शिल्पाने पोस्टमध्ये लिहिलं.

हेही वाचा… अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून; कंगना रणौत पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, शिल्पाच्या कामाबाबत सांगायचं झालं तर शिल्पाने ‘इंडियन पोलीस फोर्स’ या रोहित शेट्टीच्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी तिचा ‘सुखी’ चित्रपट आला होता, त्यालाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty kundra was awarded by champions of change 2023 she shared photos and videos dvr