Shilpa Shetty and Raj Kundra : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांच्या घरावर आणि ऑफिसवर ईडीची धाड पडली आहे. जुहू येथील घर आणि ऑफिसवर ही धाड पडली आहे त्यामुळे या दोघांच्या मागे सुरु असलेलं शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाही अशी स्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढल्या

पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात ईडीने ही कारवाई करत धाड टाकली आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं घर तसेच ऑफीसची झडती घेतली जात आहे. ‘अश्लील’ चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा याला जून २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर पडला.

राज कुंद्राने पॉर्न फिल्म निर्मितीतून कमावले कोट्यवधी रुपये

राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने पॉर्न फिल्म्सद्वारे फक्त बक्कळ कमाई केली नाही तर त्यांनी देशाच्या कायद्यांना बगल देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. पण हे प्रकरण उघडकीस आलं तरी कसं ? मुंबई पोलिसांनी यासंदर्भात ४ फेब्रुवारी २०२१ मध्ये एक केस दाखल केली होती. मालवणी पोलिस स्टेशनमध्ये या रॅकेटसंदर्भात एका मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

मालाड येथील बंगल्यावर छापा मारण्यात आला होता

चित्रपट आणि ओटीटीवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक तरूणींना अश्लील चित्रपटात काम करण्याची जबरदस्ती करत आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून मोठी कमाई करत आहेत असा दावाही या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मालाड वेस्टमधील एका बंगल्यावर छापा मारला. तो बंगला भाड्याने घेऊन तेथे पॉर्न फिल्मचे शूटिंग करण्यात येत होतं. पोलिसांनी छापा टाकून बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसह ११ जणांना अटक केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty raj kundra house and office ed raid in money laundering probe link case in pornographic content scj