Raj Kundra Shilpa Shetty Property Seized by Enforcement Development: अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ईडीने शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये शिल्पाच्या नावावर असलेल्या जुहूतील फ्लॅटचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एएनआय’ने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, ईडीने शिल्पा शेट्टीचा पती रिपू सुदन कुंद्रा म्हणजेच राज कुंद्रा याच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ही कारवाई पीएमएलए २००२ अंतर्गत तरतुदींनुसार करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या जुहूमधील फ्लॅटचा समावेश आहे. याचबरोबर शिल्पा व राज यांचा पुण्यातील बंगला व राज कुंद्राच्या नावावर असलेले इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती ईडीने दिली आहे.

शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. दोघांची तब्बल ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या होत्या, त्याआधारे ईडीने तपास सुरू केला. आरोपींनी त्यांनी बिटकॉइन्सच्या रूपात १० टक्के दरमहा परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात लोकांकडून निधी गोळा केल्याचा आरोप आहे. आकडेवारीनुसार तो ६६०० कोटी रुपये असल्याचा आरोप आहे. गोळा केलेल्या बिटकॉइन्सचा वापर बिटकॉइन गुंतवणुकीत करण्यात आला. त्याद्वारे गुंतवणूकदारांना कूट चलनात मोठा परतावा मिळणार होता. परंतु प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”

ईडीने केलेल्या तपासणीनुसार, राज कुंद्राला युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेनबिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि प्रमोटर अमित भारद्वाजकडून २८५ बिटकॉइन्स मिळाले होते. हे बिटकॉइन्स अमितने लोकांना फसवून जमा केलेल्या पैशांमधून घेतले होते. राज व अमित यांची डील पूर्ण होऊ शकली नाही, पण ते २८५ बिटकॉइन्स अजुनही त्याच्याजवळ आहेत, ज्यांची सध्याची किंमत १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींना ‘इतक्या’ लाखांची दिलेली सुपारी; पोलिसांची माहिती

यापूर्वी याप्रकरणी शोध मोहिम राबवून सिम्पी भारद्वाज (१७ डिसेंबर २०२३), नितीन गौर (२९ डिसेंबर २०२३) आणि निखिल महाजन (१६ जानेवारी २०२३) या तिघांना अटक करण्यात आली होती, हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज हे अजुन फरार आहेत. याप्रकरणी ईडीने यापूर्वी ६९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात ११ जून २०१९ रोजी तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. नंतर यावर्षी १४ फेब्रुवारीला त्याने सप्लिमेंट्री तक्रार दाखल केल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाने या तक्रारींची दखल घेतली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty raj kundra properties worth crore seized by ed hrc