बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनयाने चित्रपटांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९९३ मध्ये तिने ‘बाजीगर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. अभिनेत्रीने या इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. आता लवकरच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता खुद्द अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “हृतिकवर कोणालाच विश्वास नव्हता…” अमिषा पटेलने सांगितल्या ‘कहो ना प्यार है’दरम्यानच्या आठवणी

मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्राने आर्थर रोड जेलवर घालवलेल्या दिवसांवर चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्राची बाजू जनतेसमोर येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट राज कुंद्राच्या वादग्रस्त प्रकरणावर भाष्य करणारा असेल. या चित्रपटात शिल्पा शेट्टीची महत्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. आता खुद्द अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे. शिल्पा म्हणाली, “या चित्रपटात माझी कोणतीही भूमिका नाहीये ज्याबाबत मी तुम्हाला सांगेन.” शिल्पाच्या या वक्तव्यानंतर ती राज कुंद्राच्या बायोपिकमध्ये काम करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चित्रपटात राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवले जाणार आहेत. अद्याप चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नावही समोर आलेले नाही. पण राज कुंद्रा चित्रपटाच्या निर्मितीपासून ते स्क्रिप्टपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असणार आहे असं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असेल याबद्दलही चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- “मी वाईट आई आहे”, मुलीच्या पहिल्या घटस्फोटाला नीना गुप्ता स्वतःला मानतात जबाबदार; मसाबाने केला खुलासा

या चित्रपटात राज कुंद्रा स्वत: अभिनय करणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अद्याप या चित्रपटावर काम सुरू झाले नसून शिवाय याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच याचे चित्रीकरण सुरू होईल असं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty reaction any role in husband raj kundra biopic dpj