शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. शिल्पाचा पती राज हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. शिल्पाने राजशी पैशांसाठी लग्न केल्याची टीका अनेकदा तिच्यावर केली जाते, या गोष्टीवरून तिला ट्रोलही केलं जातं. आता शिल्पाने या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. राज श्रीमंत आहे हे गुगल करताना ते माझ्याबद्दल माहिती काढायला विसरले होते, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झूम’ शी बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाली, “जेव्हा मी राजशी लग्न केले तेव्हा गुगलच्या मते तो १०८ वा सर्वात तरुण किंवा सर्वात श्रीमंत ब्रिटिश भारतीय होता, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यावेळी गुगलवर शिल्पाबद्दल माहिती काढायले लोक विसरले, जी स्वत:ही श्रीमंत होती. मी आता अजून जास्त श्रीमंत झाले आहे आणि माझे सर्व आयकर, जीएसटी बिलं भरते.”

Video: सनी लिओनीला कंपनीत भागीदारी देणं ही तुमची चूक, ‘शार्क टँक इंडिया ३’ मध्ये अमन गुप्ताचं परखड मत

शिल्पा पुढे म्हणाली, “एक यशस्वी महिला तिच्या जोडीदारामध्ये फक्त पैसा शोधत नाही. राज श्रीमंत होता म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं नाही, कारण पैसा माझ्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता. राजपेक्षाही खूप श्रीमंत लोक होते ज्यांना मी आवडायचे, पण राज माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घेतल्यानंतर मी लग्न केलं. जर त्याच्याकडे पैसे असते, पण तो चांगला माणूस नसता तर मी त्याच्याशी लग्न केलं नसतं. मी माझ्या खूप चांगल्या मित्राशी लग्न केलं आहे. मुलींनी त्यांच्या मित्राशी लग्न करावं,” असा सल्लाही शिल्पाने दिला.

प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून, राजस्थानमध्ये शाही सोहळ्यात मीरा बांधणार लग्नगाठ

राज कुंद्राने २००३ मध्ये कविता कुंद्राशी लग्न केलं होतं, अवघ्या तीन वर्षात ते वेगळे झाले. लंडनमध्ये एका परफ्यूम ब्रँडच्या लाँचिंग कार्यक्रमादरम्यान राज आणि शिल्पाची भेट झाली. राजने लग्नासाठी मागणी घातली तेव्हाची आठवण शिल्पाने सांगितली होती. “मला सरप्राइज देण्यासाठी राजने पॅरिसमधील पूर्ण बँन्क्वेट हॉल बुक केला होता. आम्ही रोमँटिक डेट एन्जॉय करत होतो. जेवणासह लाइव्ह म्युझिकचा आनंद घेत होतो. मग राजने गुडघ्यांवर बसून मला सर्वांसमोर प्रपोज केलं. मला अजूनही तो क्षण आठवतो,” असं शिल्पा म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty says she is not married raj kundra for his money i am rich too hrc