बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने रविवारी रात्री धमाकेदार दिवाळी पार्टी दिली. अनिल कपूरपासून शमिता शेट्टी, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, एकता कपूर, आर्यन खान, सेलेब्स या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आता शमिता शेट्टीचा दिवाळी रांगोळीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दिवाळी पार्टी सुरू होण्याच्या काही तास आधीचा आहे. यामध्ये शिल्पा तिची मुलगी समिशा शेट्टी आणि मुलगा विआन यांच्यासह रांगोळी काढताना दिसत आहे. समीशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पा शेट्टीच्या या व्हिडीओला २.४१ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. चाहतेही शिल्पाच्या मुलांचं कौतुक करत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत. व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘रांगोळी काढण्याची आमची वार्षिक परंपरा कायम… आशा आहे की या वर्षात तुम्हाला आरोग्याची संपत्ती, सकारात्मकतेचा प्रकाश आणि भरपूर समृद्धी लाभो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

आणखी वाचा-Video- आमिरचा भाऊ फैजल खानचा साधेपणा, रस्त्यावर दिवाळीची खरेदी करतानाचा व्हिडीओ व्हायरल

शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून तिचं आणि तिच्या मुलांचं कौतुक केलं आहे. शिल्पा शेट्टी आपल्या मुलांना लहान वयातच आपली परंपरा आणि भारतीय संस्कृती कशी आहे हे शिकवत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मुलगा वियानपेक्षा अनेकांना समीशाचं खूप कौतुक वाटत आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “मुलांना भारतीय संस्कार आणि संस्कृतीचे धडे देत आहात हे पाहून अभिमान वाटतो. देव तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करो. तुमची दिवाळी आनंदी आणि आरोग्यदायी जावो.”

आणखी वाचा-“शिल्पा शेट्टीमुळे तुला लोक…” ट्रोलर्सना राज कुंद्राचं चोख उत्तर

शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं तर, सोनल जोशी दिग्दर्शित ‘सुखी’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी लवकरच दिसणार आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीची डेब्यू वेब सीरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्येही दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासह सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शिल्पा शेट्टी अखेरची ‘हंगामा २’मध्ये दिसली होती. यामध्ये तिच्यासह परेश रावल, मीजान आणि प्रणिता सुभाष यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty share video of daughter samisha making rangoli on diwali 2022 goes viral mrj