भारतात सेलिब्रिटींची मुलं म्हणजेच ‘स्टारकिड’ म्हटलं की घराणेशाहीच्या वादाला तोंड फुटतं. पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात आलेले अनेक ‘स्टारकिड’ आहेत. पण एक ११ वर्षांचा ‘स्टारकिड’ असा आहे, ज्याने अवघ्या १० व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मोठा झाल्यानंतर तो बॉलीवूडमध्ये येईल की आणखी वेगळं काहीतरी करेल, याबद्दल कल्पना नाही. मात्र सध्या तो सर्वात कमी वयाचा उद्योजक ‘स्टारकिड’ नक्कीच आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना ११ वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव वियान आहे. २०१२ मध्ये त्याचा जन्म झाला होता. वियानने गेल्या वर्षी अवघ्या १० व्या वर्षी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले. त्याने कस्टमाइज्ड स्नीकर्सचा व्यवसाय सुरू केला होता. ‘VR Kicks’ असं त्याच्या स्टार्टअपचं नाव आहे. एखाद्या व्यक्तीच्या मागणीनुसार वियानचा ब्रँड स्नीकर्स डिझाइन करून देतो. वियानने त्याच्या व्यवसायासाठी एक प्रमोशनल व्हिडीओ शूट केला होता, तो शेअर करत शिल्पाने त्याच्या मुलाचं कौतुक केलं होतं.

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
Actress Amrita Subhash makes her directorial debut with a play
दिग्दर्शिका…झाले मी!

‘बाजीराव मस्तानी’ भयंकर चित्रपट आहे, असं पेशव्यांच्या वंशजांना का वाटतं? जाणून घ्या

व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने लिहिलं होतं, “माझा मुलगा वियान-राजचा पहिला आणि अनोखा व्यवसाय. @vrkickss ‘Creative Customized Sneakers’. लहान मुलांना आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. या व्यवसायाची कल्पना, संकल्पना ते डिझाइन आणि अगदी व्हिडीओपर्यंत… हे सर्वकाही त्याने केलं आहे. एक उद्योजक आणि दिग्दर्शक. महत्त्वाची बाब म्हणजे इतक्या कमी वयात त्याने त्याच्या नफ्यातील काही रक्कम दान द्यायचं ठरवलं आहे. तो फक्त १० वर्षांचा आहे.”

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

शिल्पा शेट्टी ही ९० च्या दशकातील बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. ती जवळपास तीन दशकानंतरही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. ती चित्रपटांमध्ये काम करत आहे. याबरोबर ती रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतही दिसते. १९९३ मध्ये ‘बाजीगर’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने एकापेक्षा सुपरहिट चित्रपट दिले. तिने तिचा पती राज कुंद्रा हा उद्योगपती आहे. राज कुंद्राची एकूण संपत्ती जवळपास ३ हजार कोटी रुपये आहे, असं वृत्त ‘डीएनए’ने दिलं आहे.

Story img Loader