अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या वागण्या-बोलण्याने नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. कधी योगा, तर कधी वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या शिल्पाला सतत नवीन काहीतरी करून बघण्याचा ध्यास आहे. आता तिने सोशल मिडीयावरून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पण त्यासोबत व्हायरल होणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. सर्वजण तिचं कौतुक करत आहेत.

शिल्पा शेट्टी सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. याचं कारण तिने मुंबईत सुरु केलेला नवीन कॅफे हे आहे. बॉलिवूडमध्ये काम करताना उद्योग क्षेत्रात पाऊल टाकणारी शिल्पा पहिलीच अभिनेत्री नाही. याआधी प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, सलमान खान, सुनील शेट्टी, सैफ अली खान, आदित्य पांचोली, आमिर खान यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये त्यांचं नशीब आजमावलं आहे. या यादीत शिल्पा शेट्टीचंही नाव टॉपमध्ये आहे. तिचं मुंबईत आधीच एक रेस्टॉरंट होतं आणि आता ती आणखी एका कॅफेची मालकीण झाली आहे. या तिच्या नव्या कॅफेचं नाव आहे ‘संडे बिंज.’

आणखी वाचा : सचिन तेंडुलकरची लेक सारा करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट? फोटो व्हायरल

मुंबईमध्ये शिल्पाने स्वतःचा नवीन पिझ्झा कॅफे सुरु केला आहे. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याची माहिती दिली. तिने हा कॅफे सुरू केल्यावर मिडीया फोटोग्राफर्सनी तिथे जात शिल्पाच्या नव्या कॅफेचे फोटो काढण्यासाठी तिला विनंती केली. यावेळी तिने फोटोग्राफर्सना दिलेल्या वागणुकीमुळे सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. शिल्पाच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. रेस्टॉरंटचे ओपनिंग झाल्यानंतर तिने उतिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना पिझ्झा वाटण्यास सुरुवात केली. तसंच त्या हॉटेलचे फोटो काढण्यासाठी आलेल्या मिडीया फोटोग्राफर्सना जेवून जाण्याची विनंती करताना ती दिसली.

हेही वाचा : Photos: आईसह शिल्पा शेट्टी पोहोचली वाराणसी येथे, घेतला गंगा आरतीचा आनंद

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी खरं तर पॅपराजींमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेकदा ती त्यांच्याशी संवाद साधताना आणि थांबून फोटोंसाठी पोज देताना दिसते. शिल्पा शेट्टीचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात ती फोटोग्राफर्सशी खूप प्रेमाने वागताना दिसली आहे. तिच्या या वागणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Story img Loader