सध्या सर्वत्र होळीचा उत्साह आहे. राज्यासह संपूर्ण देशात धूमधडाक्यात होळीचा सण साजरा केला जातो. बॉलिवूड सेलिब्रिटीही इतर सणांप्रमाणेच होळीही साजरी करतात. अनेक ठिकाणी बॉलिवूडकरांकडून धुलिवंदनसाठी मोठ्या पार्ट्यांचं आयोजनही केलं जातं. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही तिच्या मुंबईतील राहत्या घरी कुटुंबीयासंह होळी साजरी केली. याचा व्हिडीओ शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पाने इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या या व्हिडीओला “होलिका दहन” असं कॅप्शन दिलं आहे. “आम्ही आमच्यातील नकारात्मक विचार, भावना एका चिठ्ठीत लिहून ती होळीच्या अग्नीत टाकली. प्रत्येक वर्षी आम्ही असं करतो. देव नेहमी आपल्या पाठीशी असतो. तो नेहमी आपलं रक्षण करतो. तुमच्यातील नकारात्मकता संपवून सकारात्मक विचार आणि आनंद होळीच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात येतात, असं मला वाटतं. तुम्हा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा”, असं म्हणत शिल्पाने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, शिल्पाच्या या पोस्टवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “दर महिन्याला तिला १० लाख रुपये पोटगी देतो”, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर पत्नी आलियाची प्रतिक्रिया, म्हणाली “पुराव्यांसह…”

हेही वाचा>> “जुन्या साड्या नेसू नको” आशुतोषबरोबर लग्न केल्यानंतर नेटकऱ्यांचा अरुंधतीला अजब सल्ला, म्हणाले “दोन वाट्यांचं मंगळसूत्र…”

शिल्पाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. होळीच्या अग्नीत बांबूच्या झाडाची लाकडे जाळल्याने शिल्पाला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. “हिंदू धर्मात बांबूची लाकडे जाळत नाहीत”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “होळीच्या अग्नीत बांबूची लाकडे टाकत नाहीत”, असं म्हटलं आहे. “चप्पल घालून कोण पूजा करतं?” असंही एकाने म्हटलं आहे. “होळी कधीच घरात पेटवली जात नाही” अशी कमेंटही केली आहे. तर एका नेटकऱ्याने “या होळीत राज कुंद्राचे मास्कही जाळून टाक” असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकी प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली “नवाजुद्दीन साहेब…”

शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते. याबरोबर नवे प्रोजेक्ट व वैयक्तिक आयुष्याबाबतही शिल्पा पोस्ट शेअर करताना दिसते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty troll for burning bamboo sticks in holika dahan kak