७७ वा स्वातंत्र्यदिवस देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. अगदी सर्वसामान्यांपासून ते राजकारणी आणि सेलिब्रिटींनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक बॉलीवूड कलाकारांनी झेंडावंदन करतानाचे फोटोही शेअर केले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रानेही आपल्या कुटुंबियांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकरांनी केले राधिका आपटेच्या पात्राचे कौतुक; म्हणाले, “ज्या वंचित आणि बहुजनांनी…”

शिल्पाने राष्ट्रध्वज फडकावला आणि ध्वजारोहणाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. दरम्यान, ध्वजारोहण करताना पायात तिने बूट (मोजडी) घातली होती. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर ट्रोलिंगच्या खूप कमेंट्स होत्या. त्यावर शिल्पाने ट्रोल्सर्सना चोख प्रत्युत्तर दिले.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“देशाचा ध्वज फडकावताना तुमचे बूट आणि चप्पल काढून ध्वजाच्या दोरीला स्पर्श करा. जय हिंद जय भारत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!” अशी कमेंट एका युजरने केली होती. “चप्पल घालून झेंडा कोण फडकवतं, यापूढे असं करू नका,” असं एका युजरने म्हटलं होतं.

शिल्पा शेट्टीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शिल्पा शेट्टीचे ट्रोल करणाऱ्यांना उत्तर

व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सातत्याने ट्रोलिंगच्या कमेंट्स आल्यानंतर शिल्पाने चोख प्रत्युत्तर दिलं. “ध्वज फडकवताना कोणते नियम पाळावेत, हे मला माहीत आहे. माझ्या देशाबद्दल आणि ध्वजाबद्दलचा आदर माझ्या मनातून येतो, प्रश्न विचारण्यासाठी नाही. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. आजची पोस्ट ती भावना शेअर करण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी होती. सर्व ट्रोल करणार्‍यांनो (ज्याकडे मी सहसा दुर्लक्ष करतो) या दिवशी तुम्ही तुमचे अज्ञान आणि नकारात्मकता पसरवत आहात. त्यामुळे बोलण्याआधी तथ्ये तपासा,” असं शिल्पाने पोस्टमध्ये अॅड करत म्हटलं.

शिल्पाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत ट्रोलर्सना उत्तर दिलं
शिल्पाने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये बदल करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं

दरम्यान, या व्हिडीओमध्ये शिल्पा पती राज कुंद्रा, तिची आई आणि मुलगा वियान राज कुंद्राबरोबर झेंडा फडकवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty trolled for wearing shoes while flag hoisting actress reply back hrc