अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जुलै २०२१ मध्ये पोर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. दोन महिने त्याला तुरुंगात राहावे लागले होते. दरम्यान अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्राने त्याच्या तुरुंगातील दिवसांवर भाष्य केलं आहे.

हेही वाचा- “माझ्या लैंगिकतेबद्दल सर्वप्रथम…”, करण जोहरने केला शाहरुख खानबद्दल खुलासा; म्हणाला, “तो कायम…”

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
tharala tar mag next epiosde arjun rescue madhubhau from the jail
ठरलं तर मग : अखेर मधुभाऊंची जेलमधून होणार सुटका! अर्जुनने कोर्टात घेतली मोठी जबाबदारी, पाहा प्रोमो

नुकतचं राज कुंद्राने इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत राजने आपल्या वाईट काळाबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. तुरुंगात असताना राजच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. राजने हे विचार त्याची पत्नी शिल्पा शेट्टीला सांगितले होते. राजचे हे विचार ऐकून शिल्पाला मोठा धक्का बसला होता आणि भावनिक होऊन शिल्पाने भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता.

राज कुंद्रा म्हणाला “शिल्पाने मला विचारलेलं तुला परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे आहे का? तू म्हणत असशील तर मी सगळी सोय करते. आपण कायमचं भारत सोडून जाऊ. पण मी विचार केला. मोठ्ठी मोठ्ठी लोक कोट्यावधीचे घोटाळे करुन भारतातून पळून जातात. पण मी असं काहीच केलं नाही ज्याच्यामुळे मी देश सोडून जाईन. मला खूप अपमानास्पद वाटत होते. माझ्यामुळे माझे आई-वडील, पत्नी आणि मुले यांना टार्गेट केले जात होते. हे सर्व खूप वेदनादायक होते.”

हेही वाचा- रणबीर कपूरची मोठी घोषणा! अभिनयातून घेणार सहा महिन्यांचा ब्रेक, कारण आलं समोर

राज कुंद्राच्या बायोपिक ‘यूटी ६९’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राज कुंद्राने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या दिवसांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.