बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करायला काहींना वेळ लागतो तर काही जण एका चित्रपटामुळे लोकप्रिय होतात. कमी वेळेत लोकप्रियता मिळते, पण ती टिकवून ठेवणं तितकंच कठीण असतं आणि ते खूप कमी जणांना जमतं. एका लहान चुकीमुळे अनेकांचं करिअर संपतं. असचं काहिसं ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ फेम अभिनेत्याबरोबर घडलं. अभिनेता शायनी अहुजा करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला आणि आता ९ वर्षांपासून हा अभिनेता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शायनीबद्दल या गोष्टी आता बोलण्याचं कारण म्हणजे ‘भुलभुलैय्या ३’ चित्रपटाची घोषणा होय. अक्षय कुमार व विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या ‘भुलभुलैय्या’मध्ये शायनी एका महत्त्वाच्या भूमिकेत होता. शायनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा जन्म नवी दिल्लीत पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील भारतीय सैन्यात लेफ्टनंट होते. २००५ मध्ये सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या क्लासिक चित्रपटातून शायनीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. २००६ मध्ये या चित्रपटासाठी शायनीला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट दिले. आमिर खान-काजोलच्या ‘फना’ या सिनेमात त्याने दर्जेदार अभिनय केला. ‘गँगस्टर’ आणि ‘वो लम्हे’ या सिनेमांमधून त्याला ओळख मिळाली. या दोन्ही चित्रपटांत कंगना राणौत त्याच्यासह प्रमुख भूमिकेत होती.

हेही वाचा… “तू सिंगल आहेस हे साफ खोटं…”; रितिका श्रोत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘भूल भुलैया’या चित्रपटांमुळे शायनी अहुजाचं करिअर नव्या उंचीवर पोहोचलं होतं. परंतु जून २००९ रोजी शायनीला त्याच्या घरातील १९ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार करण्याच्या आणि तिला धमकावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. गंभीर आरोप होताच शायनीचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं. २००९ ते २०१५ पर्यंत तो फक्त तीन चित्रपटांमध्ये दिसला. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम बॅक’ चित्रपटात तो शेवटचा दिसला होता.

हेही वाचा… फटाके नाही, निमंत्रण पत्रिकाही नाही…; रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी ‘असे’ अडकणार लग्नबंधनात

शायनी अहुजाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर त्याने मॉडेल अनुपमशी १९९७ साली लग्न केलं आणि या जोडप्याला अर्शिया नावाची मुलगी आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiney ahuja had super hit films but his bollywood career ended due to a rape case dvr