Chhaava Box Office Collection Day 6 : १९ फेब्रुवारीला सगळीकडे शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्यात शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसांआधी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये शिवजयंतीला मोठी वाढ झाली आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छावा’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट शुक्रवारी (१४ फेब्रुवारीला) प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. याचदरम्यान, विकीने मंगळवारी रात्री घोषणा केली की तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त रायगडावर जाईल. म्हटल्याप्रमाणे तो रायगडावर गेला आणि महाराजांना अभिवादन केलं, तसेच कार्यक्रमात सहभागी झाला.

‘छावा’चे सहा दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

शिवजयंतीच्या दिवशी ‘छावा’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘छावा’ने पहिल्या दिवशी ३३.१ कोटींची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली होती. दुसऱ्या दिवशी ‘छावा’ने ३९.३ कोटींचा गल्ला जमावला. तिसऱ्या दिवशी ४९.०३ कोटींचे कलेक्शन केले, तर चौथ्या दिवशी २४.१ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने २५.७५ कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी म्हणजेच शिवजयंतीला चित्रपटाने तब्बल ३२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाचे सहा दिवसांचे भारतातील कलेक्शन २०३.२८ कोटी रुपये झाले आहे.

विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना (फोटो – इन्स्टाग्राम)

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाचे बजेट १३० कोटी होते. या चित्रपटाने बजेट अवघ्या तीन दिवसांत वसूल केले. त्यानंतर आता चित्रपट दमदार कमाई करत आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे, तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहित पाठक हे कलाकार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv jayanti 2025 chhaava box office collection day 6 increased vicky kaushal raigad chhatrapati sambhaji maharaj hrc