बॉलिवूडमधील ७०च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘शोले.’ हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला याचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. ‘शोले’ हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे ज्याने रुपेरी पडद्यावर १०० दिवस आपली जादू कायम ठेवली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि अमजद खानसारखे बडे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

या चित्रपटातील छोटयातलं छोटं पात्रंदेखील आज प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अगदी गब्बर सिंगपासून गावात कापूस पिंजणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येक पात्र सलीम-जावेद यांनी त्यांच्या लिखाणातून जीवंत केलं. याच चित्रपटातील एका पात्राने आणि त्याच्या एका संवादाने एका अभिनेत्याचं आयुष्यच बदलून टाकलं. ‘शोले’मध्ये सांभा या डाकूचं पात्र निभावणारे मॅक मोहन यांना यामुळे एक स्वतंत्र ओळख मिळाली. आज आपण मॅक मोहन यांच्या पुण्यतिथीनिमित्तच त्यांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

Mumbai Police registered murder case after body found in Mahim Khadi
माहीम खाडीतील मृतदेहाप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
Hindi is not Indias national language R Ashwins controversial statement video viral
R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल

आणखी वाचा : ‘शोले’ बद्दल या रंजक गोष्टी माहितीयेत का?

अभिनयात नव्हती रुची :
मॅक मोहन यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी आपला शेजारी देश पाकिस्तानमधील कराची येथे झाला. चित्रपटात येण्यापूर्वी मॅक मोहन यांना मोहन मखिजानी या नावाने ओळखले जात होते. वडिलांच्या बदलीमुळे मॅक मोहन यांना कराचीहून लखनऊमध्ये स्थायिक व्हावे लागले आणि मग तिथूनच त्यांनी आपले शिक्षणही पूर्ण केले.

फिल्मी दुनियेत खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मॅक मोहन यांना तेव्हा अभिनयाची अजिबात आवड नव्हती, तर त्यांना क्रिकेटर व्हायचे होते. त्यांना क्रिकेटची इतकी आवड होती की, खूप मेहनत करून त्यांनी उत्तर प्रदेश क्रिकेट संघातून खेळायला सुरुवात केली. आपल्या आवडीचं रूपांतर करिअरमध्ये घडवू पाहणाऱ्या मॅक मोहन यांना वाटायचे की क्रिकेटचे सर्वोत्तम प्रशिक्षण फक्त आणि फक्त मुंबईतच मिळते. याचसाठी त्यांनी १९५२ मध्ये मुंबई गाठली.

आणखी वाचा : “आमचं मुंबईचं घर बँकेने जप्त केलं आणि…” आदिनाथ कोठारेने शेअर केली ‘त्या’ खडतर प्रसंगाची आठवण

क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या मॅक मोहन यांनी मुंबईतील रंगमंच पाहिल्यावर त्यांना याचे खूप आकर्षण वाटले. जेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना शौकत कैफीच्या नाटकातील भूमिकेबद्दल विचारले तेव्हा मॅक मोहन यांनी चटकन होकार दिला आणि इथूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. नाटकांमध्ये काम केल्यानंतर, मॅक मोहन यांनी १९६४ मध्ये ‘हकीकत’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र ‘शोले’मधील छोट्या भूमिकेतून त्यांना इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली.

Story img Loader