‘तांडव’ वेब सीरिजमध्ये आदिती मिश्रा नावाचं पात्र साकारणारी शोनाली नागरानी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. शोनालीने आतापर्यंत अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलंय. आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडणाऱ्या शोनालीने पती शिराज भट्टाचार्यपासून विभक्त झाल्याचा खुलासा केला आहे. ती पतीपासून विभक्त राहतेय, पण घटस्फोटाची पक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Arijit Singh Love Story: वर्षभरात घटस्फोट, एका मुलाची आई असलेल्या मैत्रिणीशी दुसरं लग्न अन्… जाणून घ्या अरिजीतच्या पत्नीबद्दल

‘बिग बॉस सीझन ५’ मध्ये दिसलेली शोनाली नागराणीने २०१३ मध्ये शिराजशी लग्न केले होते. पण त्यांचं नात फक्त सहा वर्ष टिकलं व २०१९मध्ये ते वेगळे झाले. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शोनालीने वैवाहिक जीवनाचा अनुभव शेअर केला. तसेच घटस्फोटाचा निर्णय व दरम्यानच्या काळातील त्रासाबद्दलही भाष्य केलं.

हेही वाचा- वर्षभरात मोडलेलं पॉर्नस्टार मिया खलिफाचं दुसरं लग्न, ‘या’ कारणाने पती रॉबर्टला दिलेला घटस्फोट

शोनाली म्हणाली, “माझा पती आणि मी फेब्रुवारी २०१९ मध्ये वेगळे झालो आणि घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. एका वेळी, मी भावनिकदृष्ट्या उध्वस्त झाले होते आणि माझ्याकडे इतकी ऊर्जा उरली नव्हती की मी माझ्या कामासाठी, कुटुंबासाठी स्वतःला समर्पित करू शकेन. मी स्वतःचा द्वेष करू लागले आणि माझा स्वाभिमान व आत्मविश्वास पूर्णपणे खाली गेला. हसायला आणि हसवायला आवडणारी शोनाली केव्हा, कुठे गायब झाली ते कळलंच नाही.”

शोनाली पुढे म्हणाली, “मग मला समजले की माझ्याकडे एक पर्याय आहे, पीडितेसारखं कटू आठवणींसह जगणं किंवा आयुष्यात विखुरलेल्या गोष्टी सावरण्यावर लक्ष केंद्रित करणे. मी स्वतःला यातून सावरण्याचा व वाईट गोष्टींना चांगलं करण्याचा पर्याय निवडला. मी वैयक्तिक यशासाठी व स्वतःच्या शोधासाठी एक मैलाचा दगड म्हणून या अनुभवाचा वापर केला.”

लग्नानंतर शोनाली ५ वर्षे काम करू शकली नाही. पतीपासून विभक्त झाल्यानंतर कामावर परतणे कठीण होते. एक वेळ अशी आली जेव्हा शोनाली इतकी तुटली की मुंबई सोडून तिने गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला आणि ‘तांडव’ ही वेबसीरिज मिळाली. ही सीरिज तिला ऑडिशनशिवाय मिळाली होती. या सीरिजमध्ये तिच्या दमदार अभिनयाने तिला यशस्वीरित्या पुनरागमन करता आलं, असं शोनालीने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shonali nagrani talks about separation from husband shiraz bhattacharya after six years of marriage hrc