गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. ‘आदिपुरुष’नंतर आता दिग्दर्शक नितेश तिवारी आता करत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’स्टार यश हा ‘रावण’ म्हणून दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्टसुद्धा दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे, इतकंच नव्हे तर तो यासाठी मांसाहार व मद्यपानही बंद करणार असल्याची चर्चा आहे. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवा अपडेट समोर येत आहे.

मधु मंटेना या चित्रपटाची निर्मिती करणार होते. चित्रपटाच्या स्क्रिप्ट आणि स्केलवर ते नितीश यांच्याबरोबर सतत काम करत होता. मधू मंटेना हेच निर्माते आहेत ज्यांनी अल्लू अरविंदसोबत ‘गजनी’ची निर्मिती केली होती. मधू मंटेना अल्लू अरविंदसहच ‘रामायण’ची निर्मिती करणार होते. हा चित्रपट व्हीएफएक्सवर पूर्णपणे बेतलेला असल्याने त्यांनी जगातील सर्वोत्तम व्हीएफएक्स कंपनी DNEG चे मालक नमित मल्होत्रा ​​यांना चित्रपटाशी जोडले. नमित यांच्या कंपनीने कित्येक हॉलिवूड चित्रपटांसाठी तसेच रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी काम केलं आहे.

आणखी वाचा : Kajol Deepfake Video: रश्मिकापाठोपाठ काजोलचा ‘डिपफेक’ व्हिडीओ व्हायरल; कपडे बदलतानाची क्लिप चर्चेत

या चित्रपटाच्या कास्टिंगवरुन मधू आणि नमित यांच्यात बरेच मतभेद सुरू झाले, यानंतर आता समोर आलेल्या वृत्तानुसार मधू मंटेना यांनी या चित्रपटापासून निर्माता म्हणून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. सध्या नमित आणि त्यांच्या कंपनीच या चित्रपटावर काम करत असून नितेश तिवारी हे याचं दिग्दर्शन करणार आहेत. मीडिया रीपोर्टनुसार गेल्या सहा महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर काम सुरू आहे.

चित्रपटाचं कास्टिंगसुद्धा फायनल झालं असून रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, केजीएफ स्टार यश हा रावण अन् सनी देओल हनुमान म्हणून चित्रपट दिसणार असल्याचं मीडिया रीपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. तसेच या चित्रपटाचं चित्रीकरण मार्च २०२४ पासून सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच निर्माते याबद्दल माहिती देतील असं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shooting of ranbir kapoor nitesh tiwari ramayana will start soon avn