अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. हा चित्रपट ८ मार्चला रिलीज होणार आहे. गेले अनेक दिवस रणबीर आणि श्रद्धा त्यांच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. आता त्याचंच फळ म्हणून या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय.

शनिवारी संध्याकाळपासून ‘तू झूठी में मक्कार’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंला तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहता रणबीर व श्रद्धाचा हा चित्रपट दमदार कमाई करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vicky kaushal increase weight and also learn horse riding
‘छावा’मध्ये कास्ट करण्याआधी दिग्दर्शकाने विकी कौशलला सांगितलेल्या ‘या’ दोन गोष्टी; म्हणाला, “मी ७ ते ८ महिने…”
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”

आणखी वाचा : पुण्याला पोहोचताच श्रद्धा कपूरने घेतला अस्सल पुणेरी मिसळ व वडापावचा आस्वाद, म्हणाली…

‘तू झूठी मैं मक्कार’ च्या पहिल्या दिवसाच्या शोची सुमारे ७० हजार तिकिटं विकली जाण्याची आशा आहे. रविवारी रात्रीपर्यंत या चित्रपटाची देशभरात जवळपास ३० हजार तिकिटं विकली गेली आहेत. या ॲडव्हान्स बुकिंगमधून जवळपास ५ कोटी रुपये कमाई होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे हा प्रतिसाद पाहता रणबीर आणि श्रद्धाचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी जवळपास १५ कोटी रुपयांची कमाई करेल असाही अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा : श्रद्धा कपूरने सांगितलं उत्तम मराठी बोलता येण्यामागचं गुपित, म्हणाली, “कारण मी…”

‘तू झूठी में मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने टी दोघं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Story img Loader