अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तिच्या वागणुकीमुळे, साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. कालच तिचा वाढदिवस झाला. हा वाढदिवस तिने अगदी हटके पद्धतीने साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

श्रद्धा सध्या तिच्या आगामी ‘तू झुठी मै मक्कार’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी देखील तिने सुट्टी घेतली नाही. ती प्रमोशनच्या निमित्ताने एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा तिने केक कापत नाही तर वडापाव खात तिचा वाढदिवस साजरा केला.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

आणखी वाचा : श्रद्धा कपूरने सांगितलं उत्तम मराठी बोलता येण्यामागचं गुपित, म्हणाली, “कारण मी…”

श्रद्धा खूप फूडी आहे आणि वडापाव तिला अत्यंत प्रिय आहे. यापूर्वी अनेकदा तिने तिचं वडापावबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे. आता तिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देखील ती वडापावचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसत आहे. तिच्या एका हातामध्ये वडापाव ठेवलेली एक ताटली दिसत आहे. तर दुसऱ्या हाताने ती वडापाव खात आहे. त्यावेळी तिथे उपस्थित एका पापराझीने तिला विचारलं की, “वडापाव कसा आहे?” त्यावर श्रद्धा म्हणाली, “वडापाव खूप छान आहे. बेस्टेस्ट आहे. खूप गरम आहे.”

हेही वाचा : श्रद्धा कपूर विनामेकअप दिसते ‘अशी’, अभिनेत्रीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित

आता तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहून श्रद्धाच्या साधेपणाचं आणि नम्रपणाचं पुन्हा एकदा सर्वजण कौतुक करू लागले आहेत.

Story img Loader