श्रद्धा कपूरला बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. अभिनयाबरोबर श्रद्धाची निरागसता आणि नम्रपणा नेटकऱ्यांना भावतो. श्रद्धाला मराठी संस्कृतीविषयी प्रचंड आपुलकी आणि प्रेम आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे आणि मावशी पद्मिनी कोल्हापुरे या दोघी आहेत. या दोघींमुळे श्रद्धाला मराठी संस्कृती आणि परंपरेविषयी बऱ्याच गोष्टी माहिती आहे. अभिनेत्रीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “पाकिस्तानमधील प्रयोग, दहशतवादी हल्ला अन्…”, ‘ताली’ फेम सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…
गेल्या आठवड्यात श्रद्धा कपूर टी-सीरिजच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होती. यावेळी अभिनेत्रीने पापाराझींशी मराठी भाषेत संवाद साधला. “तुम्ही सर्वांनी मोदक खाल्ले? किती खाल्ले?” असा प्रश्न श्रद्धाने मराठीतून पापराझींना विचारला. यावर त्यांनी “उकडीचे नाही खाल्ले बाकी, खूप मोदक खाल्ले असं उत्तर दिलं.” श्रद्धा आणि पापाराझींमध्ये झालेल्या या मराठी संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फिल्मीग्यान या पापाराझी पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा : निवेदिता सराफ यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळालं मोठं पदक, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…
श्रद्धा कपूरचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भारावले आहेत. “बॉलीवूडमधील सर्वात सुंदर आणि गोड अभिनेत्री”, “मराठी मुलगी”, “संस्कृती जपणारी अभिनेत्री” अशा कमेंट्स तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा : “मराठी लोकांमध्ये हावरटपणा नव्हता”, जितेंद्र यांनी केलं कौतुक; म्हणाले, “तेव्हा लबाड…”
दरम्यान, श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतचं तिने तिच्या आगामी चित्रपट ‘स्त्री २’ च्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण केलं आहे. हा चित्रपट ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी अशी तगडी स्टारकास्ट होती.