अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये घेतलं जातं. आपल्या साधेपणामुळेही श्रद्धाचं सगळीकडे कौतुक केलं जातं. चित्रपटांबरोबर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही श्रद्धा नेहमी चर्चेत असते. दरम्यान श्रद्धा आता नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. श्रद्धा एका प्रसिद्ध लेखकाला डेट करत असल्याची सगळीकडे चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “पूर्ण कपड्यांमधील फोटो शेअर केला तरी…”, भूमी पेडणेकरने ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा प्रसिद्ध लेखक राहूल मोडीला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. इंस्टेंट बॉलीवुडने याबाबत सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे. राहूलने श्रद्धा कपूरच्या ‘तू झुठी, मैं मक्कर’ या चित्रपटाची कथा लिहिली होती. या चित्रपटाशिवाय राहुलने ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. श्रद्धा कपूर आणि राहुल यांच्या डेटिंगच्या बातमीनंतर सोशल मीडियावर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

याअगोदर श्रद्धा सेलिब्रिटीज फोटोग्राफर रोहन श्रेष्ठला डेट करत असल्याची चर्चा होती. तब्बल ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२२ मध्ये दोघे वेगळे झाले असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान काही दिवसांपूर्वी श्रद्धा आणि अभिनेता आदित्य राय कपूर यांच्या अफेअरच्या चर्चांनीही जोर धरला होता. दोघांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘आशिकी २’ चित्रपटातील दोघांच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती.

हेही वाचा- “शिक्षा भोगणं…”, संजय दत्तला आठवले तुरुंगातील दिवस; म्हणाला, “ग्रंथ वाचन, स्वयंपाक अन्…”

काही दिवसांपूर्वीच श्रद्धाच्या एका फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला होता. त्याला श्रद्धाने अगदी हजरजबाबीपणे उत्तर दिलं होत. श्रद्धाने उत्तर देत लिहिलं होतं “पडोस वाली आंटी रियल आयडी से आओ.”श्रद्धाने दिलेलं हे जबरदस्त उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा-

श्रद्धाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच राजकुमार रावबरोबर ‘स्त्री २’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा व्यतिरिक्त या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor found new love reportedly dating tu jhoothi main makkar writer rahul mody dpj