अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. आतापर्यंत ती अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाबरोबर तिचा वैयक्तिक आयुष्यामुळे ती चांगलीच चर्चेत असते. तर आता लग्नावरून प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याला तिने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
श्रद्धाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून श्रद्धा तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तिचं लग्न कधी होणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नाबद्दल नुकताच तिला तिच्या एका चाहत्या आणि प्रश्न विचारला. त्याला श्रद्धाने अगदी हजरजबाबीपणे उत्तर दिलं आहे.
श्रद्धाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे दोन फोटो शेअर केले. यामध्ये ती वनपिस घालून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिचा हा अंदाज आवडल्याचं सांगितलं. तर एका चाहत्याने कमेंट करत तिला विचारलं, “लग्न कधी करणार?” चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत श्रद्धाने लिहिलं, “पडोस वाली आंटी रियल आयडी से आओ.”
तर आता श्रद्धाने दिलेलं हे जबरदस्त उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे. तिच्या उत्तरावर लाईक आणि कमेंट करत तिचे चाहते तिचा हा दिलखुलासपणा आवडल्याचं सांगत आहेत.