अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी २०२४ हे वर्ष खूप खास ठरले आहे. तिच्या ‘स्त्री २’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घेतलेल्या उड्डाणांची झेप कोटींपर्यंत गेली. ‘स्त्री २’नंतरही श्रद्धा कपूरवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. या यशानंतर श्रद्धाला अनेक सिनेमांत भूमिकांसाठी विचारणा होत आहे. तसेच, दक्षिणेतील एका सिनेमात तिला आयटम साँगसाठीदेखील विचारणा झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे श्रद्धा बॉलीवूडमधील सर्वाधिक व्यग्र अभिनेत्रींपैकी एक ठरली आहे. असे असले तरी यंदा श्रद्धा तिच्या घरची दिवाळीची साफसफाई स्वतःच करणार असल्याचे तिने स्वतःच उघड केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रद्धा कपूर अनेकदा कार्यक्रमांमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधते आणि त्यांची विचारपूस करते. नुकतेच ‘व्हिरल भैय्यानी’च्या पापाराझीशी विमानतळावर श्रद्धा कपूरने मराठीत संवाद साधला; ज्यात ती दिवाळीच्या साफसफाईबद्दल बोलत आहे, असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा…“…आणि सलमानने फुटपाथवरून गाडी चालवली”, ‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला…

घर आता चकाचक करणार?

अभिनेत्री श्रद्धा कपूर विमानतळावरून एका कार्यक्रमातून बाहेर येताना एका व्हिडीओत दिसत आहे. त्यात श्रद्धा कपूर चालत असताना जोरात ‘आई गं’, असे म्हणते. पुढे ती पुन्हा चालायला लागते, तेव्हा एक पापाराझी तिला मराठीत म्हणतो, “आता मी घरी जाऊन दिवाळीची साफसफाई करणार आहे.” त्यावर श्रद्धा मराठीत विचारते, “दिवाळीची साफसफाई सुरू झाली का?” त्यावर पापाराझी सांगतो, “माझ्या घरी साफसफाई आणि फराळाची तयारी सुरू झाली आहे.” मग श्रद्धा पापाराझीला विचारते, “घर आता चकाचक करणार का?”

तुमचा काय प्लॅन?

याच व्हिडीओत पापाराझी श्रद्धाला विचारतो, “तुमचा दिवाळीचा काय प्लॅन आहे?” तेव्हा श्रद्धा उत्तर देते, “आता सगळं सुरू करायचं आहे. साफसफाई करायची आहे. खूप कामं आहेत.”

हेही वाचा…पत्नीला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला स्वीकारलं; मात्र अनुपम खेर यांना स्वतःचं मूल नसल्याची खंत, म्हणाले, “तो…”

श्रद्धा दिसणार ‘पुष्पा २’मध्ये?

‘स्त्री २’नंतर श्रद्धाला बॉलीवूडसोबत साऊथ इंडस्ट्रीतूनही विचारणा होत आहे. ‘गुल्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा कपूर अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमात आयटम साँग करताना दिसणार आहे. अद्याप त्याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही आणि श्रद्धानेदेखील त्यावर वक्तव्य केलेले नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor going to clean her house on the occasion of diwali viral video psg