अभिनेत्री श्रद्धा कपूरने २०११ मध्ये ‘लव्ह का द एंड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिच्या ‘आशिकी-२’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि श्रद्धा रातोरात स्टार झाली. केवळ शक्ती कपूर यांची मुलगी म्हणूनच नाही तर स्वत:चे कौशल्य सिद्ध करत तिने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिला एकाच वेळी अनेक ॲक्सेंटमध्ये बोलता येते, श्रद्धाचा असाच एक व्हिडीओ ‘नेटफ्लिक्स इंडिया’ने शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रद्धा कपूर ब्रिटिश, फ्रेंच आणि अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलताना दिसत आहे.
हेही वाचा : आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा? अमृता देशमुख म्हणाली, ‘हे’ गुण असतील तर…
‘नेटफ्लिक्स इंडिया’ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये श्रद्धाला विचारण्यात आले नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, तू अगदी सहजपणे इतर अॅक्सेंटमध्ये बोलू शकतेस हे खरे आहे का? यावर श्रद्धाने अस्खलित ब्रिटिश, फ्रेंच आणि अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलून दाखवले. या व्हिडीओची सुरुवात तिने फ्रेंच ॲक्सेंटमध्ये केली. त्यानंतर ती सहज ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये बोलू लागली आणि शेवटी तिने अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलून आपले कौशल्य दाखवले. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचे भरभरून कौतुक करीत आहेत.
हेही वाचा : शाकाहारी असल्याचे सांगत खाल्ला ‘चिकन बर्गर’, रश्मिकाची नवी जाहिरात पाहून नेटकऱ्यांचा संताप
श्रद्धाचे टॅलेंट पाहून तिचे चाहते प्रभावित झाले असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिच्या ब्रिटिश ॲक्सेंटची तुलना थेट हॅरी पॉटरमधील पात्र हर्मिओन ग्रेंजरसोबत केली आहे. तर दुसऱ्या एक युजरने म्हटले आहे, “लवकरच हे कौशल्य पाहून श्रद्धाला इंटरनॅशनल सीरिजमध्ये काम मिळाले पाहिजे.” तसेच काही जणांनी “श्रद्धा ही बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे जिचा इंग्रजी ॲक्सेंट एवढा चांगला आहे…हॉलीवूड क्वीन”, “तुझा ॲक्सेंट ऐकून तू शक्ती कपूर यांची मुलगी आहेस असे वाटतच नाही,” असे म्हणत तिला दाद दिली आहे.
श्रद्धाच्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.