बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरला ओळखले जाते. अभिनयाबरोबर श्रद्धाची निरागसता आणि नम्रपणा नेटकऱ्यांना भावतो. श्रद्धाला मराठी संस्कृतीविषयी प्रचंड आपुलकी आणि प्रेम आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे आणि मावशी पद्मिनी कोल्हापुरे या दोघी आहेत. या दोघींमुळे श्रद्धाला मराठी संस्कृती आणि परंपरेविषयी बऱ्याच गोष्टी माहिती आहे. तिला अनेक मराठमोळे पदार्थही आवडतात. तिने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपल्या आवडत्या मराठमोळ्या पदार्थाविषयी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : “पावसाळी ट्रेक अन् गडावर जेवणाचा बेत”, मराठमोळा अभिनेता फिरतोय सह्याद्री, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री श्रद्धा कपूरने हातात ताट घेऊन स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या ताटात असलेल्या मोदकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ताटातील मोदक आपल्या चाहत्यांना दाखवत अभिनेत्री लिहिते, “मला मोदक खूप आवडतात, गणेश चतुर्थीपर्यंत वाट पाहू शकले नाही…” अर्थात मोदक प्रचंड आवडत असल्याने मी गणपतीच्या सणापर्यंत वाट पाहू शकत नाही असे श्रद्धाला यातून सुचित करायचे आहे.

हेही वाचा : सुष्मिता सेनने ललित मोदींबरोबरच्या नात्यावर सौडलं मौन; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “माझ्या वैयक्तिक…”

महाराष्ट्रात गणपतीमध्ये घरोघरी मोदक बनवले जातात. त्यामुळे श्रद्धाने आपल्या आवडत्या पदार्थाविषयी सांगताना गणपती बाप्पाच्या आगमनाचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने वडापावचा फोटो शेअर करत मावशी पद्मिनी कोल्हापुरेला वडापाव बनवून देण्यासाठी धन्यवाद म्हटले होते. यावरून तिचे मराठमोळ्या पदार्थांवर असलेले प्रेम स्पष्ट दिसून येते.

हेही वाचा : “हिंदू आहेस मंदिरात जा”, ‘तारक मेहता’ फेम मुनमुन दत्ता मशिदीत गेल्यामुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “तुला अनफॉलो…”

दरम्यान, श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरबरोबर ‘तू झुठी में मक्कार’या चित्रपटात दिसली होती. पुढच्यावर्षी श्रद्धाचा बहुचर्चित ‘स्त्री २’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती राजकुमार रावसह मुख्य भूमिकेत दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor loves maharashtrian modak actress shared photo on instagram sva 00