२०२४ मध्ये श्रद्धा कपूर केवळ ‘स्त्री २’ च्या प्रचंड यशामुळेच नव्हे, तर पटकथा लेखक राहुल मोदीबरोबरच्या तिच्या कथित नात्यामुळेही चर्चेत आली होती. गेल्या काही काळापासून श्रद्धा आणि राहुल डेटिंगमुळे चर्चेत आहेत. अनेकदा एकत्र दिसल्यामुळे तसेच श्रद्धाने सोशल मीडियावर राहुलबरोबरचे फोटो शेअर केल्यामुळे या चर्चांना उधाण आले. अलीकडेच श्रद्धाचा मोबाईल वॉलपेपरचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामुळे त्यांच्या नात्याविषयी पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या आठवड्यात श्रद्धा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली, तेव्हा तिने कॅज्युअल पोशाख घातला होता. गुलाबी जॅकेट, निळ्या लेगिंग्सवर तिने केस बांधलेले होते. तिच्याबरोबर एक काळ्या रंगाची जिम बॅग होती आणि ती कारमध्ये जाताना दिसली.

हेही वाचा…बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”

कारचा दरवाजा उघडताना, तिच्या फोन स्क्रीनची एका क्षणासाठी झलक पाहायला मिळाली. त्यावर एक वॉलपेपर होता, ज्यामध्ये ती आणि एक व्यक्ती एकमेकांजवळ उभे आहे असे त्या फोटोमध्ये दिसते आहे. यावरून चाहत्यांनी लगेचच अंदाज लावला की तो व्यक्ती राहुल मोदीच आहे, जो श्रद्धाचा कथित बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये श्रद्धाने राहुलबरोबरच्या एका आऊटिंगचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये वडा पावची प्लेट दिसत होती, ज्यावर तिने कॅप्शन लिहिले होते, “मी नेहमी तुला वडा पाव खायला नेण्यासाठी त्रास देत राहू का?”

हेही वाचा…तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

श्रद्धाने या चर्चांवर कोणतेही भाष्य केलेले नाही, परंतु ‘कॉस्मोपॉलिटन’ला दिलेल्या मुलाखतीत तिने अप्रत्यक्षरीत्या तिच्या नात्याबाबत संकेत दिले होते. तिने सांगितले, “मला माझ्या जोडीदाराबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं, मग ते सिनेमा पाहणं असो, डिनरला जाणं असो किंवा प्रवास करणं असो. मला माझ्या जोडीदाराबरोबर एकत्र वेळ घालवणं किंवा अगदी काहीच न करता बरोबर राहणंही खूप आवडतं.”

श्रद्धा आणि राहुल यांच्या नात्याबाबतची चर्चा २०२४ च्या सुरुवातीला सुरू झाली, जेव्हा ते अनेक कार्यक्रमांमध्ये, तसेच एका मित्राच्या लग्नात एकत्र दिसले होते. राहुल मोदी हे ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाचे पटकथा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये श्रद्धा आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा…जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”

कामाच्या आघाडीवर, श्रद्धाने नुकताच ‘स्त्री २’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केला. हा चित्रपट २०१८ च्या तिच्या हिट हॉरर-कॉमेडी ‘स्त्री’चा सिक्वेल होता, ज्यामध्ये ती राजकुमार रावबरोबर झळकली होती. तिच्या पुढील चित्रपटाच्या घोषणेची चाहत्यांना प्रतीक्षा असली तरी, सध्या श्रद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यात चांगला वेळ घालवत आहे.

Story img Loader