‘स्त्री’ चित्रपटाच्या यशानंतर ‘स्त्री २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिक कमाई केली. पुन्हा एकदा श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) आणि राजकुमार रावची जोडी सुपरहिट ठरली. अनेक रेकॉर्ड ‘स्त्री २’ चित्रपटाने मोडले. एकूण ६०० कोटींहून अधिक गल्ला जमवून श्रद्धा आणि राजकुमारच्या या चित्रपटाने ऐतिहासिक कमाई केली. ‘स्त्री २’ चित्रपटाच्या शेवटची ‘स्त्री ३’ देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची हिंट देण्यात आली आहे. पण आता ‘स्त्री ३’ चित्रपटाबाबत श्रद्धा कपूरने एक मोठी अपडेट दिली आहे.

नुकताच ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन मॅगझिन’चा अनावरण सोहळा पार पडला. ११ वर्षांनंतर हे मॅगझिन ‘द इंडियन एक्स्प्रेस’कडे पुन्हा आलं आहे. या लोकप्रिय मॅगझिनचं अनावरण श्रद्धा कपूरच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर श्रद्धाशी संवाद साधला. यावेळी तिने सध्या मिळत असलेल्या यशाबद्दल आणि ‘स्त्री ३’ चित्रपटाबद्दल सांगितलं.

हेही वाचा – Bigg Boss 18 : लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीला न घाबरता सलमान खान पोहोचला ‘वीकेंड वार’च्या शूटिंगला, ६०हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात

यशाविषयी सांगताना श्रद्धा म्हणाली की, मी अजूनही आई-वडील, भाऊ आणि माझ्या कुत्र्याबरोबर राहते. मला वाटतं, मी खूप भाग्यवान आहे. पण, यशासाठी अपयश खूप गरजेचं आहे, असं मला खूप वाटतं.

त्यानंतर श्रद्धा कपूर ‘स्त्री २’ला मिळालेल्या यशाबद्दल बोलली. यावेळी तिला ‘स्त्री ३’ चित्रपटाविषयी विचारलं. तेव्हा श्रद्धा कपूर म्हणाली, “माझे दिग्दर्शक अमर सर म्हणाले, ‘स्त्री ३’ चित्रपटासाठी कथा मिळाली आहे. त्यामुळे मी स्वतः खूप उत्सुक आहे. काहीतरी भन्नाट होणार, असं मला वाटतंय. त्यामुळे मीदेखील ‘स्त्री ३’ चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खूप उत्साहित आहे.”

हेही वाचा – “कुलरच्या पाण्यात अंघोळी करून…”, आदिनाथ कोठारेने ‘पाणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा सांगितला किस्सा, म्हणाला…

हेही वाचा – “अतुलची कमी कधीही भरून काढता येणार नाही”, अतुल परचुरेंच्या आठवणीत मिलिंद गवळी भावुक; पोस्ट करत म्हणाले, “तो हतबल झाला…”

पुढे श्रद्धा कपूरने सोशल मीडियाविषयी सांगितलं. कारण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत चाहत्यांना मजेशीर उत्तर देत असते. याबद्दल सांगताना श्रद्धा म्हणाली की, माझा सोशल मीडियाबद्दलचा अनुभव नेहमी सकारात्मक असतो.