अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी नेहमीच ओळखली जाते. तिला मराठी संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे. कालच तिचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने तिला मराठीतून शुभेच्छा दिल्या. त्या पाहून श्रद्धा भारीच खुश झालेली दिसली.

श्रद्धा सध्या तिच्या आगामी ‘तू झुठी मै मक्कार’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी देखील तिने सुट्टी घेतली नाही. ती प्रमोशनच्या निमित्ताने एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. काल तिने तिचा वाढदिवस चाहत्यांबरोबर साजरा केला. काल संध्याकाळी तिने तिचा केक कापलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टवर तिच्या एका चाहत्याने तिला मराठीतून शुभेच्छा दिल्या.

Mrunmayee deshpande
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा महिन्याचा खर्च माहितीये का? म्हणाली, “गेल्या पाच वर्षात…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
The Storyteller Movie Review in marathi
द स्टोरीटेलर : गोष्टीच्या गोष्टीची सुरेख वीण
actress Dimple Jhangiani names her daughter Shivona
प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नानंतर ८ वर्षांनी मुलीला दिला जन्म; म्हणाली, “आम्हाला वाटलं की मुलगा होईल, त्यामुळे…”
actress Gurpreet Bedi kapil arya expecting first baby
“आम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत नव्हतो पण…”, सेलिब्रिटी जोडप्याने दिली गुड न्यूज
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”

आणखी वाचा : पुण्याला पोहोचताच श्रद्धा कपूरने घेतला अस्सल पुणेरी मिसळ व वडापावचा आस्वाद, म्हणाली…

श्रद्धाने तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच त्यावर तिच्या चाहत्यांनी हजारो कमेंट्स केल्या. त्यातील काही मोजक्या लोकांना श्रद्धाने रिप्लायही दिला. या सर्व कमेंट्समधून एका चाहत्याने तिला दिलेल्या मराठीतून शुभेच्छांवर श्रद्धाची नजर पडली. चाहत्याने लिहिलं होतं, “मराठीमध्ये – पैदा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” ही कमेंट वाचताच श्रद्धाला फार आनंद झाला. लगेचच तिने या कमेंटला रिप्लाय देत लिहिलं, “थँक यू! मराठीमध्ये नेहमीच एक्स्ट्रा स्पेशल.”

हेही वाचा : श्रद्धा कपूरने सांगितलं उत्तम मराठी बोलता येण्यामागचं गुपित, म्हणाली, “कारण मी…”

आता तिचा हा रिप्लाय सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. तिच्या या रिप्लायवर अनेकांनी लाइक्स देत आणि कमेंट्स करत तिच्या मनात असलेल्या मराठी संस्कृतीबद्दलच्या प्रेमाचं कौतुक केलं आहे.

Story img Loader