Shraddha Kapoor Seeks Blessings at Shirdi : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री 2’8 (Stree 2) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. हा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी ‘स्त्री’चा सीक्वल आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने भारतात ५९० कोटींहून जास्त कमाई केली, तर जगभरातील कलेक्शन ८४० कोटींहून जास्त झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्त्री 2’ चित्रपटाची टीम सध्या या सिनेमाचं यश साजरं करत आहे. ५० दिवसांपासून हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अजूनही चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. अशातच श्रद्धा कपूरने शिर्डीतील साईबाबा मंदिराला भेट दिली आहे. तिचे साई मंदिरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये ती साईबाबाचे दर्शन घेताना दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात पुन्हा एंट्री, पण ‘तो’ एक सदस्य गैरहजर; नेटकरी म्हणाले…

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंदिराच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर श्रद्धाच्या शिर्डी भेटीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये पिवळा ड्रेस घातलेली श्रद्धा खूप सुंदर दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं

“सायकलवरून आलेल्या एका माणसाने मला…”, अभिनेत्रीने सांगितला भयंकर अनुभव; म्हणाली, “मला ओरडायचं होतं, पण…”

‘स्त्री २’ची स्टारकास्ट अन् रेकॉर्डब्रेक कमाई

श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी सिनेमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. ‘स्त्री २’ शाहरुख खानच्या ‘जवान’ च्या कलेक्शनला मागे टाकून आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ हा दिनेश विजानच्या सुपरनॅचरल युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. ‘रुही’, ‘भेडिया’ आणि ‘मुंज्या’ या चित्रपटांनंतर ‘स्त्री २’ बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर चित्रपटात अक्षय कुमार, वरुण धवन, तमन्ना भाटिया आणि अमर कौशिक यांचे कॅमिओ आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor seeks blessings at shirdi after stree 2 success hrc