श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रद्धाने तिचा प्रियकर राहुल मोदीबरोबरचा गोंडस फोटो शेअर केला आहे.
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी ट्विनिंग करताना दिसले
गुरुवारी श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती आणि तिचा प्रियकर राहुल मोदी एकसारख्या नाइट ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना दिसले. या फोटोत दोघांचा पूर्ण फोटो न घेता फक्त पाय दिसतील असा फोटो घेतला आहे. त्यांनी एकसारखा पोशाख घातला आहे. श्रद्धाने फोटोला कोणतेही कॅप्शन दिले नाही, फक्त राहुल मोदीला टॅग करून रेड हार्ट ईमोजी वापरला आहे.
श्रद्धा कपूरने यापूर्वी वडापाव डेटचा फोटो शेअर करून ब्रेकअपच्या अफवांवर पडदा टाकला होता. तिने राहुल मोदीला टॅग करत फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, “मी तुला नेहमी वडापाव खायला घेऊन जाण्यासाठी धमकावते,” आणि किशोरकुमारच्या “ये वादा रहा” या गाणे या पोस्टसाठी वापरले होते.
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदीच्या रिलेशनशिपच्या चर्चा
श्रद्धा आणि राहुल एका डिनर डेटनंतर दोघे मुंबईत एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्यातील नात्याच्या चर्चांना सुरुवात झाली, यावर त्यांनी सार्वजनिकरित्या कोणतेही भाष्य केले नाही, मात्र श्रद्धा सोशल मीडियावर राहुलबरोबर गमतीशीर फोटो शेअर करताना दिसते.
श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाबद्दल
श्रद्धा कपूरने २०२४ मध्ये तिच्या ‘स्त्री २’ या चित्रपटातून मोठे यश मिळवले. श्रद्धासह राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा हॉरर-कॉमेडी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने ८५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. श्रद्धा तिच्या आगामी ‘नागिन’ या चित्रपटात झळकणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माता निखिल द्विवेदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘नागिन’च्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला होता. याआधी ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यांनी सांगितले होते, “श्रद्धा खूप उत्साही होती. ती पहिली व्यक्ती होती जिने हा प्रोजेक्ट लगेच स्वीकारला. स्क्रिप्ट तयार होताच ती शूटिंग सुरू करण्यासाठी उत्सुक आहे.”