श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री २’ प्रदर्शित झाल्यानंतर ३९ व्या दिवशीदेखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘स्त्री २’ आतापर्यंत ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमांमध्ये गणला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशांतर्गत ६०० कोटींचा टप्पा गाठणारा हा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.
ट्रेड अॅनॅलिस्ट तरण आदर्शने म्हटल्यानुसार, शनिवारी ‘स्त्री २’ने ५९८.९० पर्यंतचा टप्पा गाठून, रविवारी ४.८५ कोटींचा टप्पा गाठत ६०३. ७५ कोटींची कमाई केली आहे.
राष्ट्रीय चित्रपटाच्या दिवशी या चित्रपटाने मोठा गल्ला जमवला आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २०) फक्त ९९ रुपये तिकीट होते. त्याचा फायदा ‘स्त्री २’ला झाल्याचे दिसले. पाचव्या आठवड्यात या चित्रपटाने २४.६५ कोटींची कमाई केली. शुक्रवारी या चित्रपटाने पाच कोटींची कमाई केली आणि शनिवार व रविवारी अनुक्रमे ३.६५ कोटी रुपये व ४.८५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा: Oscar 2025 : किरण रावची स्वप्नपूर्ती! ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट; २९ चित्रपटांमधून निवड
‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करीत शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’ला मागे टाकले आहे. ‘जवान’ने हिंदी भाषेत ५८२ कोटींची आणि देशांतर्गत ६४३ कोटींची कमाई केली होती. त्यामध्ये तेलुगू व तमीळ भाषांत डब केलेल्या ‘जवान’चा समावेश होता. आतापर्यंत संपूर्ण भारतात ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला असला तरी आता हिंदी भाषेत ‘स्त्री २’ने बाजी मारली आहे. ‘स्त्री २’ने ‘जवान’ला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे.
ब्लॉकबस्टर ठरलेले ‘हे’ चित्रपटही आघाडीच्या शर्यतीत मागे
‘स्त्री २’ने आतापर्यंत ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांनादेखील मागे टाकले आहे. त्यामध्ये रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने हिंदी भाषेत ५०२.९८ कोटींची कमाई केली; तर ‘पठाण’ चित्रपटाने हिंदी भाषेत ५२४.४३ कोटींची कमाई केली होती. फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर ५२५.७ कोटींची कमाई केली होती. या सर्व चित्रपटांना मागे टाकत ‘स्त्री २’ने इतिहास रचला आहे.
‘स्त्री २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्याबरोबर अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना व पंकज त्रिपाठी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.