मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी निर्माण करणारा अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. नुकताच तो ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत झळकला होता. या मालिकेच्या निमित्ताने त्याने अनेक वर्षांनंतर मराठीत काम केले आहे. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. श्रेयसचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट उत्सुक आहेत. श्रेयसने नुकतीच एल मुलाखत दिली आहे ज्यात त्याने सुभाष घईंबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयसने ‘इक्बाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाविषयी त्याने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “मी जेव्हा या चित्रपटाचे कथानक वाचले तेव्हा मी या चित्रपटाच्या प्रेमात पडलो. मी माझ्या काही मित्रांना याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले या चित्रपटात गाणी नाहीत, हिरॉईन नाही, तुला संवाद नाहीत अशा चित्रपटातून का पदार्पण करत आहेस?”

शाहरुखचा ‘पठाण’ सुपरहिट व्हावा यासाठी राखी सावंतने आईकडे मागितला आशीर्वाद; म्हणाली…

तो पुढे म्हणाला, “माझे मेकअप न केलेले फोटो सुभाष घईंना पाठवले तेव्हा त्यांनी माझे फोटो बघून सांगितले याचे फोटो चित्रपटाच्या पोस्टर अथवा बॅनरवर नका लावू कारण जे लोक चित्रपट बघायला येणार आहेत ते देखील येणार नाहीत.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

माधुरी दीक्षितला डावलून ‘परदेस’ चित्रपटासाठी सुभाष घईंनी केली होती महिमा चौधरीची निवड, कारण…

श्रेयस या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता, चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही मात्र या चित्रपटाचे कौतुक झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले होते तर निर्मिती सुभाष घईंनी केली होती. या चित्रपटात श्रेयस व्यतिरिक्त यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, नसरुद्दिन शहा, गिरीश कर्नाड अशी तगडी स्टारकास्ट होती. २००५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade actor talking about why his photo not on film poster because of subhash ghai spg