अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्याचा आगामी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’च्या शूटिंगनंतर घरी आल्यावर त्याने अस्वस्थ वाटत असल्याची माहिती पत्नीला दिली. त्याची पत्नी दीप्ती त्याला तत्काळ रुग्णालयात नेत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने श्रेयसच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयसच्या कुटुंबातील सदस्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं की श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे आणि तो बरा होत आहे. “श्रेयस तळपदे आता बरा आहे. तो ठिक होत असून शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. आज सकाळी तो आमच्याकडे बघून हसला. त्यामुळे आम्हा सर्वांना दिलासा मिळाला आहे. तो स्वत: काही दिवसांत माध्यमांशी बोलेल,” अशी माहिती श्रेयसच्या कुटुंबातील सदस्याने दिली.

“१० मिनिटांसाठी त्याचं ह्रदय बंद पडलं होतं”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीविषयी बॉबी देओलची माहिती

शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत श्रेयसच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली होती. श्रेयसची प्रकृती स्थिर आहे आणि शस्त्रक्रियेनंतर तो बरा होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करावी लागली. श्रेयसला काही दिवसांत मुंबईच्या बेलेव्ह्यू रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, असं दीप्तीने सांगितलं होतं.

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

दरम्यान, श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला त्या दिवशी त्याने दिवसभर ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग केलं होतं आणि तो ठणठणीत होता. तो सेटवर सर्वांशी गप्पा मारत होता, त्याने काही अ‍ॅक्शन असलेले सीक्वेन्सही शूट केले होते. शूट संपल्यानंतर तो घरी परत गेला आणि त्याची प्रकृती खालावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade family shared his health update after heart attack hrc