हिंदी चित्रपटसृष्टीमधील विनोदी चित्रपटांच्या रांगेतील ‘गोलमाल’ या चित्रपटाच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. या सीरिजमधील ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘गोलमाल अगेन’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या चार चित्रपटांनंतर आता पुन्हा गोलमालच्या सिरीजमधील चित्रपट कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदेने याबाबत भाष्य केले आहे.

हेही वाचा- “चित्रपटगृहांच्या मालकांना धमक्यांचे फोन…” ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शाहांचा मोठा दावा, म्हणाले “बेकायदेशीर बंदी…”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना श्रेयस तळपदे म्हणाला, “खरे सांगायचे तर, केवळ चाहतेच नाही तर आम्हीही ‘गोलमाल-५’ची आतुरतेने वाट पाहत आहोत. रोहित आणि अजय यांनी कोरोना सुरू होण्यापूर्वीच चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली होती. दुर्दैवाने, कोविड आला आणि परिस्थिती बदलली. खरे सांगायचे तर, कथा काय आहे हे आम्हाला माहीत नाही. हे फक्त रोहितनाच माहीत आहे. त्यामुळे जेव्हा ते मला फोन करून सांगतील तेव्हाच मी चित्रपटाच्या कथेबद्दल बोलू शकेन. पण हो, आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.”

हेही वाचा- “जणू ३ मृतदेहच…” पेट्रोल पंपावर २००० रुपयांच्या नोटा खर्च करणाऱ्या आर. माधवनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

गोलमाल फन अनलिमिटेड, रोहित शेट्टीच्या गोलमाल मालिकेतील पहिला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शर्मन जोशी, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि अजय देवगण मुख्य भूमिकांत होते. आणि यानंतर रोहित शेट्टीने त्याच्या चाहत्यांसाठी ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल-३’ आणि ‘गोलमाल अगेन’ असे तीन सिक्वेल बनवले आहेत.

Story img Loader