अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला पत्नी दीप्तीने रुग्णालयात नेलं, त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर श्रेयसची प्रकृती सुधारली आणि आता तो घरी विश्रांती घेत आहे. श्रेयसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यादिवशी काय घडलं होतं, याबाबत खुलासा केला. तसेच त्याला जाणवलेली लक्षणंही त्याने सांगितली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“हृदयविकाराचा झटका आला, त्याच्या काही दिवसांआधीपासून खूप थकवा जाणवत असल्याने मी तपासणी करून घेतली होती. मी ECG, 2D इको, सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या. माझे कोलेस्ट्रॉल जास्त होते आणि त्यासाठी मी औषधं घेत होतो. मला हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहे म्हणून मी जास्त खबरदारी घेत होतो,” असा खुलासा श्रेयसने केला.
हृदयविकाराचा झटका आला त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं, याची माहिती श्रेयसने ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या मुलाखतीत दिली. “आम्ही मुंबईत जोगेश्वरीजवळील एसआरपीएफ मैदानावर ‘वेलकम टू द जंगल’साठी शूटिंग करत होतो. दोरी पकडून चालणं, पाण्यात पडणं असे आर्मी ट्रेनिंगचे सीन आम्ही करत होतो. सगळं काही सुरळीत चालू होतं, पण अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि माझा डावा हात दुखू लागला. त्यानंतर मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेलो आणि कपडे बदलले,” असं श्रेयसने सांगितलं.
“१० मिनिटांसाठी त्याचं ह्रदय बंद पडलं होतं”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीविषयी बॉबी देओलची माहिती
“आम्ही अॅक्शन सीक्वेन्स शूट करत होतो, त्यामुळे त्रास होतोय असं मला वाटलं. कारण अशावेळी तुम्ही सर्वात वाईट काय घडू शकतं याचा विचार करत नाही. मी त्यादिवशी खूप थकलो होतो, असा थकवा मी कधीच अनुभवला नव्हता. मी कारमध्ये चढताच मला वाटलं की मी थेट हॉस्पिटलला जावं, पण आधी घरी गेलो. माझी पत्नी दीप्तीने मला त्या अवस्थेत पाहिलं आणि १० मिनिटांतच आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो, हॉस्पिटलचे गेट दिसत होते, पण तिथे प्रवेशबंदी होती आणि आम्हाला यू-टर्न घ्यावा लागला. पुढच्याच क्षणी माझा चेहरा सुन्न झाला आणि मी पडलो. तो हृदयविकाराचा झटका होता. त्या काही मिनिटांसाठी माझ्या हृदयाची धडधड थांबली होती,” असं श्रेयस म्हणाला.
“मग आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे दीप्तीला तिच्या बाजूने कारमधून बाहेर पडता आले नाही म्हणून ती मला ओलांडून मी बसलो होतो, त्याबाजूने आली आणि मदतीसाठी हाक मारू लागली. त्यानंतर काही लोक आमच्या मदतीला आले आणि मला आत नेलं. डॉक्टरांनी सीपीआर, इलेक्ट्रिकल शॉक देऊन मला जिवंत केलं. वैद्यकीयदृष्ट्या मी मृत होतो. हा हृदयविकाराचा एक मोठा झटका होता,” असं श्रेयसने सांगितलं.
बॉलीवूडचा २०२३ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, देशभरात कमावले फक्त १० हजार रुपये; तुम्ही पाहिलाय का?
“मी शुद्धीवर आलो, तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की मी त्यांच्याकडे पाहून हसलो. माझ्या पत्नीला या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागलं, त्यासाठी मी तिची माफी मागितली. नंतर मला पाच दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. आता मी विश्रांती घेत आहे. मला आयुष्यात मिळालेली ही दुसरी संधी आहे. माझा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येकाचा मी किती आभारी आहे हे मी सांगू शकत नाही,” असं श्रेयस म्हणाला.