बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची वहिनी श्रीमा राय ही लोकप्रिय ब्युटी इंफ्लुएन्सर आहे. श्रीमा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पती, मुलं व सासूबाईंबरोबरचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र तिच्या अकाउंटवर तिची नणंद ऐश्वर्या रायसोबतचे फोटो नसतात. त्यामुळे त्यांच्यात वाद असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात. अखेर श्रीमाने याबाबत मौन सोडले आहे.
श्रीमा राय ही ऐश्वर्या रायचा भाऊ आदित्य रायची पत्नी आहे. श्रीमा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कुटुंबाचे फोटो शेअर करत असते. मात्र त्या फोटोंमध्ये तिची नणंद ऐश्वर्या राय किंवा तिची लेक आराध्या बच्चन नसतात. ती कधीच त्यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट करत नाही, त्यामुळे त्यांच्यात तणाव असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर श्रीमाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – ऐश्वर्या राय बच्चनची वहिनी दिसते खूपच सुंदर! कोण आहे, काय करते श्रीमा राय? जाणून घ्या
श्रीमा रायने आता सांगितलं की तिचं नणंद ऐश्वर्या राय बच्चनशी चांगलं नातं आहे. पण ती ऐश्वर्या व आराध्याबरोबरचे फोटो पोस्ट करत नाही, कारण लोकांनी तिच्या अकाउंटवर तिलाच पाहावं, असं तिला वाटतं. “लोकांनी मला माझ्यासाठी पाहावं,” असं श्रीमाने म्हटलं आहे.
श्रीमाने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. “कधीही कुणाचा मत्सर करत नाही. कधीही कुणाला घाबरले नाही. कोणाशी स्पर्धा नाही. माझ्याजवळ माझे आशीर्वाद आहेत,” असं त्या क्रिप्टिक पोस्टमध्ये लिहिलं होतं.
श्रीमाने काही दिवसांपूर्वी केलेली पोस्ट
श्रीमा रायने काही दिवसांपूर्वी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. ज्यात तिने ब्लॉगर म्हणून स्वत:चे नाव कमावले आहे, असा उल्लेख केला होता. “ब्लॉगर होण्याआधी, मी अनेक वर्षे वेल्थ मॅनेजमेंटमध्ये काम केले. मी २००९ मध्ये मिसेस इंडिया ग्लोब राहिले आहे. मी माझे करिअर घडवण्यासाठी कोणाचेही नाव वापरलेले नाही. एक महिला म्हणून मला माझ्या स्वतंत्र कामगिरीचा अभिमान आहे,” असं श्रीमाने पोस्टमध्ये लिहिलं होतं.
श्रीमाच्या सोशल मीडिया पोस्ट्समधून तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते. श्रीमाला फिरायची खूप आवड आहे. ती पती व मुलांबरोबर अनेक ठिकाणांना भेटी देते. बरेचदा त्यांच्याबरोबर तिच्या सासूबाई वृंदा राय यादेखील असतात. श्रीमाचे इन्स्टाग्रामवर एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहे. ती लाइफस्टाइल व ब्यूटी टिप्स देत असते. ती अनेक फॅशन ब्रँड्ससाठी मॉडेलिंगचं काम करते.
श्रीमाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पुष्पगुच्छाचा फोटो शेअर केला होता. हा पुष्पगुच्छ तिला तिची नणंद ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चन नंदा व तिचा पती निखिल नंदा यांनी पाठवला होता. श्रीमाने हा फोटो पोस्ट करून श्वेता व निखिलचे आभार मानले होते.